गॅस सिलिंडरच्या दरवाढीनंतर सबसिडीचा लाभही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:51 AM2021-02-23T04:51:17+5:302021-02-23T04:51:17+5:30
अंबाजोगाई : केंद्र सरकारकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गॅसच्या ...
अंबाजोगाई : केंद्र सरकारकडून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गॅसच्या सबसिडीचा एक रुपयाही सिलिंडर धारकांच्या खात्यावर जमा झाला नाही. यामुळे सबसिडी गेली कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अगोदरच कोरोनाच्या स्थितीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनता आर्थिक संकटांचा सामना करीत आहे. अशी स्थिती असतांना गॅसची भाववाढ सातत्याने होत आहे. परिणामी सामान्य नागरिकांचे या भाववाढीमुळे कंबरडे मोडले आहे. शासनाच्या या महागाईच्या धोरणामुळे नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी व झाडांची कत्तल रोखण्यासाठी. तसेच ग्रामीण भागातील महिलांना धुरापासून होणारा त्रास रोखण्यासाठी केंद्र शासनाने उज्ज्वला गॅस योजना राबविली. या योजनेच्या माध्यमातून गरीबांना मोफत गॅस दिला जात होता. मात्र, अचानकच उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांनाही या लाभापासून वंचित ठेवले. आता त्यांनाही महागडया किंमतीचा गॅस विकत घ्यावा लागणार आहे.
गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे पुन्हा सरपणाची आवश्यकता भासते की काय? अशी स्थिती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. अगोदरच तालुक्याच्या ठिकाणांहून गॅस आणावा लागायचा. आता तो गॅस महाग झाल्याने शोभेची वस्तू होते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.