पाच महिन्यात तीन ठिकाणी झाला गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:32 AM2021-05-23T04:32:55+5:302021-05-23T04:32:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कडा : सध्या निवृत्त सैनिक, जीविताला किंवा संपत्ती मोठ्या प्रमाणावर असलेल्या लोकांकडे परवानाधारक पिस्टल असते. पण ...

There were three shootings in five months | पाच महिन्यात तीन ठिकाणी झाला गोळीबार

पाच महिन्यात तीन ठिकाणी झाला गोळीबार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कडा : सध्या निवृत्त सैनिक, जीविताला किंवा संपत्ती मोठ्या प्रमाणावर असलेल्या लोकांकडे परवानाधारक पिस्टल असते. पण त्याचा वापर योग्य ठिकाणी न होता रक्ताच्या नातेवाईक व भाऊबंदकीतच गोळ्या झाडल्या केला जात असल्याचे चित्र आहे. दरम्यान, आष्टी, पाटोदा तालुक्यात पाच महिन्यात तीन ठिकाणी परवानाधारक पिस्टलमधूनच गोळ्या झाडल्याच्या घटना घडल्या.

परवानाधारक पिस्टल वापरणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यापासून स्वसंरक्षण व मालमत्ता संरक्षण होत नाही. तर दहशत निर्माण करण्याचा प्रकार होत आहे. सध्याच्या परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे. त्यातच दारूच्या नशेत घरगुती कलह वाढू वागले आहेत. हे करीत असताना प्रशासन वेळोवेळी समज ही देत असते. पण जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत आष्टी, पाटोदा येथील दोन निवृत्त सैनिकांनी तर पाटोदा येथे एका खासगी ठेकेदार यांनी स्वत:कडे असलेल्या परवानाधारक पिस्टलमधून भाऊकीत तर आष्टीत जन्मदात्या बापावर पोटच्या गोळ्याने गोळ्या झाडल्याची घटना घडली. असे असले तरी जीवितहानी झाली नाही. परंतु यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे परवानाधारक पिस्टल बाळगताना त्यावरील निर्बंध आणखी कडक करावेत, अशी मागणी शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी केली आहे.

....

दारूच्या नशेत घडतात प्रकार

आष्टीत एक व पाटोदा तालुक्यात दोन अशा तीन ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना या पाच महिन्यात घडल्या आहेत. परवानाधारक पिस्टल वापरणाऱ्या लोकांनी हा गोळीबार केला आहे. संबंधित ठिकाणी पोलीस पथकांनी भेटी दिल्या आहेत. रागावर नियंत्रण ठेवून दारूच्या नशेत असे प्रकार घडत आहेत. याला आळा बसणे गरजेचे असल्याचे आष्टीचे उपअधीक्षक विजय लगारे यांनी ‘ लोकमत ’ ला सांगितले.

...

Web Title: There were three shootings in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.