बीड जिल्ह्यातील २९ शाळांची मोठी दुरुस्ती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 11:33 PM2020-03-05T23:33:19+5:302020-03-05T23:33:57+5:30
समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
बीड : समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयातील २९ जि. प. शाळांच्या मोठया दुरस्तीसाठी मान्यता देण्यात आली असून यासाठी १ कोटी १४ लाख ६४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ९५ टक्के निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. उर्वरित शाळांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील साकुड येथील उर्दू शाळेसाठी ५ लाख ८४ हजार रुपये, राडी जि. प. माध्यमिक शाळेसाठी ५ लाख ७८ हजार रुपये, तर घाटनांदुर शाळेसाठी ३ लाख ४८ हजार व साकेफळ येथील उर्दू शाळेसाठी ५ लाख ४३ हजाराचा निधी मंजूर केला आहे.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील शाळेसाठी ३ लाख ९० हजार, टाकळी शाळेसाठी २ लाख ७५ हजार, धारूर तालुक्यात चोरंबा शाळेसाठी ४ लाख ७४ हजार, सोनीमोहा येथे १ लाख ३१ हजार, आसोला शाळेसाठी ४ लाख ९२ हजार, चारदरी येथील शाळेसाठी ३ लाख ३७ हजार, फकीर जवळा शाळेसाठी २ लाख ६१ हजार रुपये निधी मंजूर झाला. केज तालुक्यातील तांबवा शाळेसाठी ४ लाख ९८ हजार, लाडे वडगाव शाळेला ४ लाख ९९ हजार, सादोळा शाळेसाठी २ लाख २२ हजार तर उंदरी येथील शाळा दुरुस्तीसाठी ५ लाखांचा निधी मिळणार आहे. गेवराई तालुक्यातील रुई १ लाख ६४ हजार, खेर्डा ३ लाख २३ हजार मन्यारवाडी ३ लाख ५७ हजार तर नवे बोरगाव येथील शाळेसाठी ५ लाख २३ हजाराचा निधी उपलब्ध होणार आहे. वडवणी येथील जि. प. केंद्रीय प्राथमिक शाळा व जि. प. मुलींच्या शाळेसाठी प्रत्येकी ४ लाख ९९ हजार, खडकी शाळेसाठी २ लाख २४ हजार , खळवट लिंबगाव व साळिंबा शाळेला प्रत्येकी ४ लाख ९९ हजार तर बोहगव्हाणच्या शाळेसाठी ४ लाख ७१ हजार रुपये निधी मंजूर झाला. पाटोदा तालुक्यातील चिखलीनाथ शाळेला ५ लाख , वैद्यकिन्ही २ लाख २१ हजार तर शिरुर तालुक्यातील हिवरसिंगा शाळेसाठी २ लाख ५० हजार तर परळीतील हिवरा गोवर्धनच्या शाळेला २ लाख ५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे.