थर्मलचा शिफ्टेड ऑक्सिजन प्लांट सोमवारपासून होणार कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:23+5:302021-04-24T04:34:23+5:30

अंबाजोगाई : स्वाराती रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट सोमवारच्या आत उभा राहील, ...

Thermal's shifted oxygen plant will be operational from Monday | थर्मलचा शिफ्टेड ऑक्सिजन प्लांट सोमवारपासून होणार कार्यान्वित

थर्मलचा शिफ्टेड ऑक्सिजन प्लांट सोमवारपासून होणार कार्यान्वित

Next

अंबाजोगाई : स्वाराती रुग्णालयात आवश्यक ऑक्सिजन मिळवण्यासाठी औष्णिक विद्युत केंद्रातून शिफ्ट केलेला ऑक्सिजन प्लांट सोमवारच्या आत उभा राहील, याद्वारे २८८ जम्बो सिलिंडर ऑक्सिजन दर दिवशी निर्माण होणार आहे. तर याव्यतिरिक्त लागणाऱ्या ऑक्सिजनची व्यवस्था करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीतून फोनवरून संवाद साधत ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या.

कोविडविषयक विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यासंदर्भात पालकमंत्री मुंडे यांनी गुरुवारी अंबाजोगाई येथील स्वाराती ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये भेट देऊन आढावा घेतला.

स्वाराती रुग्णालयातील ए बिल्डिंगमधील उर्वरित कामे चार दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्यावीत. ही संपूर्ण इमारत कोविड रुग्णांसाठी आरक्षित करून सोमवारपासून सुरू झालीच पाहिजे, असे सक्त निर्देश मुंडेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महाविद्यालय प्रशासनाला दिले.

या बैठकीस आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुकरे, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वाती भोर, उपअधीक्षक सुनील जायभाये, परळी थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आवाड, डॉ. चव्हाण, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, स्वारातीच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सुविधांचा अपव्यय टाळा

ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत असताना, या सुविधांचा योग्य वापर व्हावा, अपव्यय होऊ नये तसेच गरज असणाऱ्या रुग्णांनाच ते दिले जावेत, याबाबत खबरदारी घेण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

स्वारातीमध्ये आणखी एक ऑक्सिजन प्लांट

स्वाराती परिसरामध्ये उपलब्ध जागेत आणखी एक ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावा, स्वारातीसह अन्य ठिकाणचे वापरात नसलेले किंवा बंद पडलेले व्हेंटिलेटर्स तातडीने सुरू करावेत, बायपॅप मशिन्स किंवा अन्य कोणतेही आवश्यक साहित्य खरेदीची प्रक्रिया तातडीने राबवावी, ऑक्सिजनच्या उपलब्धतेनुसार बेड वाढवावेत, असेही या वेळी पालकमंत्री मुंडे म्हणाले.

लोखंडी सावरगावात बेड वाढवा

लोखंडी सावरगाव येथे सुविधा वाढवल्यास आणखी बेड वाढविणे शक्य असून, त्यानुसार बेड वाढवावेत व आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते यांना दूरध्वनीद्वारे दिले आहेत.

===Photopath===

230421\23_2_bed_26_23042021_14.jpeg

===Caption===

अंबाजोगाईत स्वाराती रूग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना स्थिती व सुिधांचा आढावा घेतला.

Web Title: Thermal's shifted oxygen plant will be operational from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.