...हे रेल्वेचे आरक्षित डबे आहेत की कोंबून भरलेली काली-पिली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:29+5:302021-09-19T04:34:29+5:30
संजय खाकरे/ लोकमत न्यूज नेटवर्क परळी : रेल्वेला जनरल डबे सध्या नसल्याने आरक्षित डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. ...
संजय खाकरे/
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : रेल्वेला जनरल डबे सध्या नसल्याने आरक्षित डब्यातच प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढली आहे. हे रेल्वेचे डबे कोंबून भरलेले काळी-पिवळी खासगी वाहन आहे का? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. परळी रेल्वे स्थानकातून सध्या विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या अद्यापही सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मार्च २०२० पासून पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काही रेल्वे डब्यांमध्ये प्रवासी संख्या वाढली आहे. विशेषत: नांदेड-पनवेल, कोल्हापूर-धनबाद या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवासी संख्या जास्त प्रमाणात आहे. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर-धनबाद या रेल्वेमध्ये फेरफटका मारला असता प्रत्येक डब्यात प्रवाशांची संख्या जास्त प्रमाणात असल्याचे दिसून आले. इतर रेल्वे गाड्यांमध्ये ही प्रवासी संख्या आता वाढू लागली आहे.
....
परळी रेल्वेस्थानकातून सुटणाऱ्या रेल्वे
नांदेड-पनवेल
पनवेल-नांदेड
काकीनाडा-शिर्डी
शिर्डी-काकीनाडा
सिकंदराबाद-शिर्डी
शिर्डी-सिकंदराबाद
विजयवाडा-शिर्डी
शिर्डी-विजयवाडा
औरंगाबाद-हैदराबाद
हैदराबाद-औरंगाबाद
बंगळूरू-नांदेड
नांदेड-बंगळूरू
कोल्हापूर-नागपूर
नागपूर-कोल्हापूर
कोल्हापूर-धनबाद
धनबाद-कोल्हापूर
आदिलाबाद-परळी
परळी-आदिलाबाद
कोल्हापूर-धनबाद
....
रेल्वे गाडीने आम्ही शुक्रवारी प्रवासास निघालो आहोत. लातूरहून तिकीट उपलब्ध न झाल्याने पंढरपूर येथून या गाडीचे तिकीट आरक्षित केले आहे. लातूर येथून प्रवासास निघालो. या गाडीत गर्दी होती.
-रवींद्र आळंदकर, मुरुड, जि. लातूर.
...
परळी रेल्वे स्टेशनमार्गे धावणाऱ्या नांदेड-पनवेल व कोल्हापूर-धनबाद या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची संख्या वाढलेली आहे.
-रेल्वे प्रशासन, परळी.
...
180921\18bed_4_18092021_14.jpg