लसीकरणातील या त्रुटी सुधारण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:56+5:302021-01-17T04:28:56+5:30
याबाबत येथील परिचारिकेला विचारले असता, नाही लिहिला, असे सांगितले. त्यांना याचे गांभीर्य समजावून सांगण्याची गरज आहे. लसीकरण कक्षातील सर्वच ...
याबाबत येथील परिचारिकेला विचारले असता, नाही लिहिला, असे सांगितले. त्यांना याचे गांभीर्य समजावून सांगण्याची गरज आहे. लसीकरण कक्षातील सर्वच खोल्यांमध्ये लाभार्थ्यांशिवाय इतरांना प्रवेश देऊ नये. प्रवेश दिला जात असल्याने गर्दी होत आहे. ही गर्दी होऊ नये, यासाठी प्रवेशद्वारावरच पोलीस कर्मचारी अथवा सुरक्षारक्षक नियुक्त करणे आवश्यक आहे, तसेच मास्क, सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत आवाहन करावे. शनिवारी कोरोना नियमांचे पालन झालेले दिसले नाही.
हातात लस घेऊन फोटोसेशन
नियमानुसार लस देणाऱ्या कक्षात कोणालाही प्रवेश नाही, परंतु शनिवारी सर्वांनीच येथे फोटोसेशन केले. परिचारिका व ब्रदरला दबाव आणला, तर काही खासगी लोकांनी तेथील लसीची बाटली उचलून घेत फोटोसशन केले. डाॅ.सुधीर राऊत हे हात जोडून सर्वांना विनंती करत होते, परंतु त्यांच्या विनंतीकडे कोणीही लक्ष दिले नाही.