ना हातात बसतात, ना खिशात मावतात; असे मोबाइल चोरट्यांना सोयीचे ठरतात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:39 AM2021-08-14T04:39:19+5:302021-08-14T04:39:19+5:30
बीड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोबाइलचोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. आकाराने मोठे मोबाइल खिशात मावत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे ...
बीड: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोबाइलचोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. आकाराने मोठे मोबाइल खिशात मावत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे काम अधिक सोपे होऊन जाते. ते हातोहात मोबाइल लांबवितात अन् नागरिकांवर पश्चाताप करण्याची वेळ येते.
सहज करता येणारा गुन्हा म्हणून चोरट्यांकडून मोबाइल चाेरीला प्राधान्य दिले जाते. विशिष्ट गुन्हेगारी टोळ्या मोबाइलचोरीच्या व्यवसायात आहेत. मोबाइलची चोरी करण्यापासून ते संपूर्ण डाटा डिलिट करुन त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतची कामे या टोळीतील सदस्यांनी वाटून घेतलेली आहेत. पोलिसांनी वेळोवेळी कारवाया केल्या, पण मोबाइलचोरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात अपयश आले आहे.
...
या भागांमध्ये मोबाइल सांभाळा
शहरातील भाजीमंडई, राजीव गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील बाजारपेठ, बसस्थानक, नगर नाका येथे मोबाइल चोरीचे गुन्हे वारंवार होत असल्याचे दिसून येते. पहिल्या लॉकडाऊनपासून राजीव गांधी चौक परिसरात भाजीविक्रेते बसतात. तेथे मोबाइलचोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागांत मोबाइल सांभाळणे गरजेचे झाले आहे.
...
म्हणून वाढला गुन्ह्यांचा आलेख
पूर्वी मोबाइल चोरीची तक्रार घेऊन ठाण्यात गेल्यास गहाळ झाल्याची नोंद रजिस्टरमध्ये घेतली जायची. या जुजबी नोंदीमुळे तपास व्यवस्थित होत नसे व गुन्हेगारांना रान मोकळे मिळायचे. मात्र, आता अशा तक्रारीवर चोरीचा गुन्हा नोंद करण्यात येतो. त्यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांचा आलेख वाढलेला दिसतो, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. मोबाइल चोरीच्या गुन्ह्यात सर्वाधिक आरोपी तरुण आहेत.
...
शहरातील मोबाइल चोरीच्या घटना
२०१९ ३२१
२०२० ३५६
२०२१ २२५
....