'...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 12:37 PM2022-06-07T12:37:49+5:302022-06-07T12:49:05+5:30

भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढांवर गावातील त्यांच्याच कार्यकर्त्याने प्राणघातक हल्ला केला.

'They ignored, time to work in the hotel'; Angry activist assaults leader in Beed | '...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला

'...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला

googlenewsNext

बीड: तालुक्यातील चौसाळा येथील माजी आमदार स्व. चांदमल लोढा यांचे नातू व भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढा (३२)  यांच्यावर गावातीलच तरुणाने धारदार शस्त्राने वार केला. यात नितीन लोढा हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबादेत खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. ही घटना ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता घडली. दरम्यान, हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून  निषेधार्थ ७ जून रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, हल्लेखोर हा लोढा यांचा कार्यकर्ता असून नेत्याने दुर्लक्ष केले, अपमानस्पद वागणूक दिली यामुळे हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, नितीन लोढा हे ६ जून रोजी नात्यातील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. रात्री साडेनऊ वाजता लोढा कुटुंबीय घरी परतले. रात्री साडेदहा वाजता गावातीलच रणजित गुंजाळ याने नितीन लोढा यांना फोन करुन भेटायचे असल्याचे सांगितले. त्यांनी सकाळी भेटू असे सांगितल्यावर मी घराकडे येत आहे, तात्काळ भेटायचे आहे, असे त्याने सांगितले. त्याला भेटण्यासाठी नितीन लोढा हे घराबाहेर येताच दुचाकीवरुन आलेल्या रणजित गुंजाळने सत्तूरने  वार केला. यात लोढा यांच्या चेहऱ्रूावर जखम झाली. आरडाओरड केल्यावर दुचाकी तेथेच सोडून त्याने बाह्यवळण रस्त्याने पोबारा केला.

परिसरातील तरुणांनी त्यास पकडून चोप दिला. नेकनूर ठाण्याचे सहायक निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक अजय पानपाटील व सहकाऱ्रूयांनी त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात वापरलेले शस्त्रही जप्त केले आहे. जखमी लोढा यांना सुरुवातीला बीडच्या खासगी दवाखान्यात दाखल केले, उशिरा औरंगाबादला हलविले.  त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपनिरीक्षक अजय पानपाटील हे जबाब नोंदविण्यासाठी औरंगाबादला रवाना झाले आहेत.  गुन्हा नोंदवून पुढील कारवाई केली जाईल, असे सहायक निरीक्षक शेख मुस्तफा यांनी सांगितले.

चौसाळ्यात स्वयंस्फूर्तीेने बंद
नितीन लोढा हे बालाघाटावरील बडे प्रस्थ आहे. पारगाव (जि.उस्मानाबाद) येथील भीमाशंकर शुगर्स कारखान्याने ते चेअरमन असून त्यांच्या पत्नी चौसाळ्याच्या माजी सरपंच आहेत. आ.विनायक मेटे यांना रामराम ठोकून नुकताच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.  हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनीआज स्वयंस्फूर्तीने व्यापारपेठ बंद ठेवली आहे. 

अपमानास्पद वागणुकीमुळे हल्ला
रणजित गुंजाळ हा नितीन लोढा यांचाच कार्यकर्ता आहे. तो सध्या बीडमध्ये एका हॉटेलात काम करतो. लोढा यांनी दुर्लक्ष केले, अपमानास्पद वागणूक दिली यामुळे हल्ला केल्याचा खुलासा त्याने चौकशीत केला, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: 'They ignored, time to work in the hotel'; Angry activist assaults leader in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.