पतसंस्था फोडणाऱ्या चोरट्याला तीन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:15+5:302021-05-05T04:55:15+5:30
तालुक्यातील गढी येथे २८ एप्रिल २०२० रोजी रात्री शिवहर शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीची खिडकी तोडून पतसंस्थेमधील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या ...
तालुक्यातील गढी येथे २८ एप्रिल २०२० रोजी रात्री शिवहर शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीची खिडकी तोडून पतसंस्थेमधील इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या व एल.ई.डी. टीव्ही असे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. या प्रकरणी पतसंस्थेच्या फिर्यादीनुसार गेवराई ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. गेवराई पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत आरोपी गोविंद बाबासाहेब गुंजाळ (रा. उक्कडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याला पकडून त्याच्या ताब्यातून माल हस्तगत करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी येथील न्या. क्रमांक १ च्या न्या. मनीषा ऐखे यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपी गोविंद बाबासाहेब गुंजाळ याला चोरीच्या गुन्ह्यात तीन वर्षे कारवास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यात सरकारतर्फे सरकारी वकील ॲड. बाळासाहेब नाकाडे यांनी काम पाहिले, तर पोलीस निरीक्षकांच्या वतीने अंमलदार शेख रफिक व इंद्रजित गायकवाड यांनी पैरवीचे काम केले.