धारूरमधून एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, पोलिसांनी पाठलाग करताच गाडी सोडून पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2024 13:19 IST2024-06-22T13:18:31+5:302024-06-22T13:19:08+5:30
माजलगाव तालुक्यातील गढी रोडवरील जायकोवाडी येथे चोरीसाठी वापरलेला टेम्पो आढळून आला.

धारूरमधून एटीएम मशीन चोरट्यांनी पळवली, पोलिसांनी पाठलाग करताच गाडी सोडून पसार
किल्लेधारुर ( बीड ): धारूर ते तेलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरमधून चोरट्यांनी चक्क मशीनच पळवल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करताच चोरट्यांनी गढी रोडवरील जायकोवाडी येथे गाडी सोडत पळ काढला.
भारतीय स्टेट बँकेची तेलगाव रोडवर शाखा आहे. येथील सेंटरवरून एटीएममशीन चोरट्यांनी टेम्पोमध्ये टाकून पळवून नेली. मशीनमध्ये २१ ते २२ लाख रुपयांची रोकड असल्याची माहिती आहे. पहाटे ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी पिकअपचा पाठलाग केला. माजलगाव तालुक्यातील गढी रोडवरील जायकोवाडी येथे चोरीसाठी वापरलेला टेम्पो आढळून आला. त्यात एटीएम मशीन आढळून आली आहे. मात्र, चोरटे पसार झाले आहेत. पोलिसांनी गाडी आणि मशीन ताब्यात घेतली आहे.
दरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पो छत्रपती संभाजीनगर येथून चोरी केलेला असल्याची माहिती धारुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डि.बी. वाघमोडे यांनी दिली.