शेतकऱ्याने पोटाला चिमटा घेत साठवलेली रोकड चोरट्यांनी केली लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 05:23 PM2022-12-26T17:23:18+5:302022-12-26T17:24:08+5:30
याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
दिंद्रुड (बीड) : कांदेवाडी परिसरात चोरट्यांनी एका घरात शिरून पाच तोळे सोने व एक लाख रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
धारूर तालुक्यातील कांदेवाडी येथील वैजनाथ आश्रुबा कांदे रविवारी रात्री जेवण करून घरी झोपले होते. सकाळी घराबाहेरील माळरानावर तीन रिकाम्या पेट्या, कागदपत्रे, साड्या आणि काही सामान अस्ताव्यस्त पडलेले कांदे यांच्या निदर्शनास आले. विखुरलेले सामान घरातील असल्याचे कांदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर कांदे यांनी दिंद्रुड पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शेळी विक्री आणि शेतमालातून आलेली जवळपास एक लाख रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे कांदे यांच्या निदर्शनास आले आहे.