तेल, बिस्किटांवर चोरट्यांचा डल्ला, रोकडही चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:10+5:302021-07-14T04:39:10+5:30

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली ...

Thieves stole oil, biscuits and even cash | तेल, बिस्किटांवर चोरट्यांचा डल्ला, रोकडही चोरली

तेल, बिस्किटांवर चोरट्यांचा डल्ला, रोकडही चोरली

Next

दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, येथील पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंद्रुड येथील गणेश मायकर या व्यापाऱ्याचे भर रस्त्यावरील किराणा दुकानाचे गोदाम फोडून तेलाचे बॉक्स, खाद्य तेलाचे डबे, बिस्किटांचे बॉक्स असा जवळपास ५० हजारांचा किराणा माल चोरट्यांनी चोरला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

दुसऱ्या घटनेत दिंद्रुड येथीलच देवदहिफळ रस्त्यावर अविनाश पांचाळ नामक व्यापाऱ्याच्या दुकानाच्या पाठीमागील पत्रा उचकटून आत प्रवेश केला. इन्व्हर्टरचा वीज पुरवठा बंद करून एक एलईडी टीव्ही व तिजोरीतील अंदाजे तीन हजार रुपये रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणात दिंद्रुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी बीड येथील अंगुली मुद्रक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसात दिंद्रुड व परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, दिंद्रुड पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

तोंड लपविण्यासाठी छत्रीचा वापर

चाणाक्ष चोरांनी तोंड लपवण्यासाठी छत्रीचा वापर

केला. चोरी करत असताना चोरट्यांनी सीसीटीव्हीसमोर छत्री उघडून तोंड लपवत चोरी करत ओळख लपवली असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शोध घेण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.

अंधाराचा फायदा घेत चोऱ्या

दिंद्रुड येथे गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे. वीज मंडळाच्या कारभारामुळे दोन दिवस दिंद्रुड अंधारात होते. या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरीच्या घटना घडत असून, वीज मंडळाला जाग केव्हा येणार आणि विजेचा लपंडाव केव्हा थांबणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

130721\sanotsh swami_img-20210713-wa0068_14.jpg

Web Title: Thieves stole oil, biscuits and even cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.