आत्महत्येचा विचार येतोय ? येथे कॉल करा, टेन्शन फ्री व्हा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 07:44 AM2023-12-20T07:44:36+5:302023-12-20T07:44:53+5:30
अंबाजोगाईचे टेली मानस केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर
- सोमनाथ खताळ
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : टोकाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्यांचे समुपदेशन करून त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे काम आरोग्य विभागाच्या टेली मानस केंद्राच्या माध्यमातून करण्यात येते. कुणी नैराश्यात असेल तर १४४१६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा, मोफत उपचार, सल्ला घ्या, असे आवाहन या केंद्राकडून करण्यात येते. वर्षभरात १७ हजार लोकांना सेवा देऊन अंबाजोगाईचे केंद्र राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे.
तज्ज्ञांकडून समुपदेशन
अंबाजोगाईसह (लोखंडी सावरगाव), पुणे आणि ठाणे या ठिकाणी टेली मानस केंद्र सुरू आहे. येथे मानसोपचार तज्ज्ञांसह समुपदेशकांची नियुक्ती आहे. कोणत्याही व्यक्तीला मानसिक आजारासंदर्भात तक्रार असल्यास त्यांना मोफत सल्ला देण्यासाठी हे टेली मानस केंद्र आधार देते.
निदान, उपचार व सल्ला
व्यसनमुक्ती, विसराळूपणा, वेडेपणा, चिंता, भीती, वर्तमानातील बदल, वारंवार विचार, संशय येणे, घाबरणे, आत्महत्येचा विचार, उन्माद, लैंगिक समस्या, भास होणे, उदासीनपणा, डोकेदुखी, मतिमंदत्व, स्किझोफ्रेनिया, अंगात येणे, निद्रानाश, अतिनैराश्य, बालवयातील मानसिक समस्या यावर उपचार व सल्ला दिला जातो. हे सर्व मोफत आहे.
४५,०००
लोकांना या सेवेच्या माध्यमातून वर्षभरात सल्ला व उपचार करण्यात आले.
कधीही कॉल करा, २४ तास सेवा
n१४४१६ हा टोल फ्री क्रमांक २४ तास चालू असतो.
nदर सहा तासांना ५ समुपदेशक, एक मानसोपचार तज्ज्ञ कर्तव्यावर.
nगरजू कोणत्याही वेळेत निसंकोचपणे कॉल करू शकतात.