शेकटा येथील प्राथमिक शाळेत तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:35+5:302021-07-15T04:23:35+5:30

शाळेत आल्यावर कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे मुख्यध्यापक रघुनाथ नागरगोजे यांनी गावातील नागरिक राहुल भारती,बंडू माने व ...

Third attempted burglary at primary school in Shekta | शेकटा येथील प्राथमिक शाळेत तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न

शेकटा येथील प्राथमिक शाळेत तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न

Next

शाळेत आल्यावर कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याचे मुख्यध्यापक रघुनाथ नागरगोजे यांनी गावातील नागरिक राहुल भारती,बंडू माने व ग्रामस्थांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांनी ऑफिस उघडून पाहणी केली असता शाळेतील कुठलेही साहित्य चोरी गेले नसल्याचे दिसून आले. यापूर्वी देखील शाळेतील टीव्हीची चोरी झाली होती. त्याची तक्रार देऊनही चकलांबा पोलीस ठाण्याकडून तपास लागलेला नाही. त्यानंतरही शाळेचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला होता. याचीही तक्रार चकलांबा पोलीस ठाण्यात दिली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा कुलूप तोडले आहे. पुढील काळात शाळेतील कागदपत्रे व मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मुख्याध्यापक व शालेय समितीने रीतसर तक्रार मंगळवार रोजी चकलांबा पोलीस ठाण्यात दिली असून तपास चकलांबा ठाण्याचे कर्मचारी काकडे करत आहेत.

140721\sakharam shinde_img-20210714-wa0050_14.jpg

Web Title: Third attempted burglary at primary school in Shekta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.