तिसऱे एकता मराठी साहित्य संमेलन आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:39 AM2021-02-17T04:39:54+5:302021-02-17T04:39:54+5:30

शिरुरकासार : ‘वेदनेला फुंकर माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एकता फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील ऐतीहासिक मनिपूर(मानूर ...

Third Ekta Marathi Sahitya Sammelan from today | तिसऱे एकता मराठी साहित्य संमेलन आजपासून

तिसऱे एकता मराठी साहित्य संमेलन आजपासून

Next

शिरुरकासार : ‘वेदनेला फुंकर माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एकता फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील ऐतीहासिक मनिपूर(मानूर )येथील श्री गुरू विरुपाक्ष साहित्य नगरीत दोन दिवसीय मराठी साहित्य संमेलनाला बुधवारपासून सुरुवात होत आहे.

संमेलनाचे उदघाटन राजकुमार तांगडे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर साळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी,राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळा,सन्मान भूमिपुत्रांचा,सांस्कृतिक कार्यक्रम,व्यंगचित्र प्रदर्शन,लेखक आपल्या भेटीला,परिसंवाद,कथाकथन, कविसंमेलन अशा उपक्रमांचे आयोजन केले आहे.नागनाथ संस्थानचे महंत शिवाचार्य महाराज आणि सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांची विशेष उपस्थिती या संमेलनाला लाभणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सविता बडे,ज्येष्ठ नेते दशरथ वनवे,सभापती उषा सरवदे,उपसभापती जालिंदर सानप,ज्येष्ठ भाजपा नेत्या चंपाबाई पानसंबळ,सरपंच चंद्रकला वनवे,उपसरपंच शौकत सय्यद,सामाजिक कार्यकर्ते खलंदर पठाण,ग्रामपंचायत सदस्य आदीनाथ नागरगोजे आदी उपस्थित राहणार आहेत. तर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,माध्यमिक शिक्षणाधिकारी विक्रम सारुक,तहसीलदार श्रीराम बेंडे,पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण,नायब तहसिलदार शिवनाथ खेडकर,किशोर सानप,गटशिक्षणाधिकारी जमीर शेख,प्राचार्य संजय तुपे,शशिकांत गायकवाड,दिलीप जायभाये यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Web Title: Third Ekta Marathi Sahitya Sammelan from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.