माजलगाववर राहणार तिसऱ्या डोळ्यांची नजर; महत्वाच्या ४६ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 03:45 PM2021-02-19T15:45:22+5:302021-02-19T15:48:16+5:30

शहरातील ४६ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तीन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी निधी राखुन ठेवण्यात आला आहे. 

The third eye will be on Majalgaon; CCTV cameras will be installed at 46 important places | माजलगाववर राहणार तिसऱ्या डोळ्यांची नजर; महत्वाच्या ४६ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

माजलगाववर राहणार तिसऱ्या डोळ्यांची नजर; महत्वाच्या ४६ ठिकाणी लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

Next
ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीतून पतसंस्था - मल्टीस्टेट संघटनेचा पुढाकार

माजलगाव : शहर पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीतून येथील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील ४६ महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे शहरात होणाऱ्या चोऱ्या, छेडछाडीचे प्रकार यासह महत्त्वाच्या घटना घडामोडींवर सीसीटीव्हीचे बारीक लक्ष राहणार आहे. गुरुवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

शहरातील चोऱ्या, छेडछाडीचे, भांडण आदीसह गुन्हेगारी घटनांसह इतर  बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी माजलगाव शहर सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे. या कार्यासाठी सामाजिक बांधिलकीतून येथील सहकारी पतसंस्था व मल्टीस्टेट फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. शहर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांनी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ यांच्यासमोर गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव मांडला होता.त्या अनुषंगाने गुरुवारी पतसंस्था मल्टीस्टेट पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय मान्य करण्यात आला आहे.

त्यानुसार शहरातील महत्त्वाची ठिकाणे असणारी संभाजी चौक, रंगोली कॉर्नर, शिवाजी चौक, नरवडे कॉम्प्लेक्स,आंबेडकर चौक, करवा पेट्रोल पंप, आझाद चौक, हनुमान चौक, परभणी टी पॉइंट, सिद्धेश्वर शाळा - महाविद्यालय, सुंदरराव सोळंके महाविद्यालया समोरील परिसर आदी 46 महत्त्वाच्या ठिकाणी उच्च दर्जाच्या कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. सदरील कॅमेरे 4  मेगापिक्सल एचडी हाय डेफिनेशन, नाईट व्हिजन आहेत. त्याबरोबर सदरील कॅमेरे कॉर्डलेस असून त्यांना डिश अँटिना आहे.ज्यामुळे या कॅमेऱ्याना ऊन पाऊस वारा यातून बिघाड होण्याची संभावना नसल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे. सर्व कॅमेऱ्यांचे नियंत्रण शहर पोलिसांकडे राहणार आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसणार आहे.

३ वर्षे देखभाल दुरुस्तीचा खर्च राखीव
शहरातील ४६ ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा तीन वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी निधी राखुन ठेवण्यात आला आहे. 

नगरसेवकांनी वार्डात सीसीटीव्ही बसवावेत
शहरात मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरे बसवले जाणार आहेत. वार्डातील गल्ली बोळात ही सीसीटीव्ही बसवले तर गुन्हेगारीवर आळा बसेल. त्यामुळे प्रत्येक वार्डातील नगरसेवकांनी वार्डात सीसीटीव्ही बसवावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Web Title: The third eye will be on Majalgaon; CCTV cameras will be installed at 46 important places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.