तिसऱ्या टप्प्यातील बोंडअळी अनुदानाचे आले ८५ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:52 PM2018-10-25T23:52:58+5:302018-10-25T23:55:14+5:30
गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रदुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई म्हणून शासनाच्या वतीने २५६ कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. पहिल्या दोन टप्प्यातील पैसे एप्रिल व जुलै महिन्यात आले होते. त्याचे वाटप सुरु आहे, तसेच तिस-या टप्प्यातील ८५ कोटी ५३ लाख अनुदन गुरुवारी आले आहे. पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाचे पैसे वाटप करण्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अक्षम्य हलगर्जीपणा झाला असून, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
बोंडअळी अनुदानासाठी पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये, तर दुसºया टप्प्यात १०२.६४ कोटी रुपये अनुदान जुलै महिन्यात बँकेत जमा झाले होते. मात्र तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम न आल्यामुळे हजारो शेतकरी मदतीपासून वंचीत होते. तिसºया टप्प्यातील अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी शेतकºयांनी वेळोवेळी आंदोलन केले होते. दुष्काळी परिस्थितीमध्ये अनुदानाच्या पैशामुळे शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मात्र, अनुदानाची रक्कम वेळेवर दिली जात नाही त्यामुळे गैरसोय होत असल्याची महिती शेतकºयांनी दिली.
जिल्ह्यात गत वर्षात ३ लाख ७८ हजार हेक्टरवर कपूस लागवड करण्यात आली होती. जिल्ह्याचे अर्थकारण कापूस पिकावर अवलंबून आहे. मात्र, बोंडअळी व इतर रोगांच्या प्रादुर्भावामुळे गतवर्षी लागवडीचा खर्च देखील शेतकºयांना मिळाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे खरिप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, रबी हंगामातील पिकांची लागवड झाली नाही. त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदान जाहीर केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील अनुदान एप्रिल महिन्याच्या शेवटी तर दुसºया टप्प्यातील अनुदान जुलै महिन्यात वर्ग केले होते. तर तिसºया व शेवटच्या टप्प्यातील अनुदानाची रक्कम आॅक्टोबर महिना अखेर देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यातील वाटपाचा अनुभव लक्षात घेता, मिळालेले बोंडअळी अनुदानाच्या तिन्ही टप्प्यातील पैसे विलंब न करता तात्काळ वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून होऊ लागली आहे.
अनुदान वाटपात जिल्हा बँकेचा चालढकलपणा
बोंडअळी अनुदान वाटप करण्याची जबाबदारी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेक डे देण्यात आली आहे. परंतु, पहिल्या दोन टप्प्यातील अनुदानाची रक्कम बँकेत जमा होऊन जवळपास ५ महिने झाले, तरी देखील शेतकºयांना पैसे वाटप करण्याची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. पैसे मिळत नसल्यामुळे शेतकºयांकडून बँकेकडे विचारणा केली असता, राष्ट्रीयकृत बँकांकडून रोख रक्कम मिळत नसल्याचे कारण मध्यवर्ती बँकेकडून पुढे करण्यात येते. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून अजूनही वंचीत आहेत, याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तवीने करण्यात आली आहे.
बीड १७ कोटी ५३ लाख
गेवराई १६ कोटी ६६ लाख
शिरुर का. ६ कोटी ६१ लाख
आष्टी ६ कोटी २५ लाख
पाटोदा ४ कोटी ९६ लाख
माजलगाव ८ कोटी३९ लाख
धारुर ५ कोटी ३६ लाख
वडवणी ५ कोटी
केज ८ कोटी ८७ लाख
अंबाजोगाई १ कोटी ७२ लाख
परळी ४ कोटी १३ लाख
एकूण ८५ कोटी ५३ लाख