तिसऱ्या श्रावण सोमवारी शिव-गणेश भक्तीचा योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:42 PM2019-08-19T23:42:17+5:302019-08-19T23:43:57+5:30
हर हर महादेव, शिवशंभो महाराज की जय या जयघोषात तिसºया श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजली.
बीड : हर हर महादेव, शिवशंभो महाराज की जय या जयघोषात तिसºया श्रावणी सोमवारी जिल्ह्यातील शिवमंदिरे गजबजली. श्री क्षेत्र परळी येथील प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासह सौताडा येथील रामेश्वर, श्री क्षेत्र कपिलधार, बीड शहराचे ग्रामदैवत कनकालेश्वर मंदिरात भाविकांनी मनोभावे दर्शन घेत हे प्रभू दुष्काळाचे संकट दूर करण्याचे साकडे घातले. तिसरा श्रावणी सोमवार आणि गणेश चतुर्थी असा योग जुळून आल्याने भाविकांनी शिवमंदिरासह गणेश मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
‘कनकालेश्वर महाराज की जय’
बीड शहरातील श्री कनकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची रेलचेल सुरु झाली. मंदिरात जाण्यासाठी पुलावर पाणी नसल्याने भाविकांची सुविधा झाली. मंदिर परिसरात विविध दुकाने लागली होती. शेकडो भाविक महिला, पुरुषांनी रांगेत पूजा, अर्चना अभिषेक करुन दर्शन घेतले. यावेळी गाभाºयातून ‘कनकालेश्वर महाराज की जय’ जा गजर ऐकायला मिळत होता. तिसºया सोमवारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेत पेठ बीड पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.
बीड शहरातील सोमेश्वर, नीळकंठेश्वर, जटाशंकर, लोकरेश्वर, बोबडेश्वर, पुत्रेश्वर, मार्कंडेयश्वर तसेच इतर शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले. शहरालगतच्या शिवदरा, पापनेश्वर व पाली येथील नागनाथ मंदिरातही भाविकांची वर्दळ होती. तसेच चाकरवाडी, गोरक्षनाथ टेकडी, रुद्रेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शन घेतले.