वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:57+5:302021-03-15T04:29:57+5:30
नवीन वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा दुष्काळ अंबाजोगाई : शहरात नवीन नागरी वस्त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. या नागरी वस्त्यांमध्ये ...
नवीन वस्त्यांमध्ये नागरी सुविधांचा दुष्काळ
अंबाजोगाई : शहरात नवीन नागरी वस्त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली आहे. या नागरी वस्त्यांमध्ये अजूनही नळ योजना, नाल्या, रस्ते यांचा मोठा अभाव आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांपुढे नगर परिषद व परिसरातील ग्रामपंचायती मालमत्ता कर व विविध कर आकारतात. मात्र, सुविधा उपलब्ध करून देत नाहीत. सुविधा उपलब्ध नसल्याने या परिसरातील रहिवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश दहातोंडे यांनी केली आहे.
चोरट्यांचा धुमाकूळ, नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या परिसरात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच लहानमोठ्या चोऱ्या वाढत आहेत. अशा स्थितीत या परिसरात पोलिसांची गस्त सुरू राहिली तर चोऱ्यांना आळा बसेल. यासाठी पोलिसी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.