दुष्काळात तेरावा महिना! महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:21 AM2021-06-30T04:21:51+5:302021-06-30T04:21:51+5:30

मागील वर्षी मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. नोव्हेंबरनंतर काही कालावधीसाठी महाविद्यालये उघडली; ...

Thirteenth month of drought! Post-matric scholarship application stuck in college | दुष्काळात तेरावा महिना! महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

दुष्काळात तेरावा महिना! महाविद्यालयातच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज

Next

मागील वर्षी मार्चपासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवावी लागली. नोव्हेंबरनंतर काही कालावधीसाठी महाविद्यालये उघडली; मात्र कोरोनामुळे पुन्हा बंद ठेवावी लागली. १९७० पासून सामाजिक न्याय विभागाकडून मॅटिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे; मात्र महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जातील त्रुटींची पूर्तता होत नसल्याने हे अर्ज महाविद्यालयातच पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे विद्यार्थी आपल्याच गावाकडे आहेत. यातच ग्रामीण भागातील रापमची वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करता आलेली नाही.

---------

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी या योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज या कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेले आहेत. महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज हे त्रुटी पूर्ततेच्याअभावी प्रलंबित आहेत. प्राप्त अर्जांपैकी अनुसूचित जातीच्या १५६१९ तसेच विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विमाप्र प्रवर्गातील २९००९ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे आवेदनपत्र मंजूर करण्यात आलेले आहे. महाविद्यालयीन स्तरावरील प्रलंबित अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही चालू आहे. -- सचिन मडावी, सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग, बीड.

-----------

मॅट्रिकोत्तर भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांचे अर्ज संबंधित महाविद्यालयांशी संपर्क करून लॉगिन करून अर्ज फॉरवर्ड करण्यास सांगितले जाते.

आधारलिंक नसणे, गुणपत्रिका, दाखला अथवा आवश्यक कागदपत्रांतील एखादे कागदपत्र जोडलेले नसणे आदी त्रुटींमुळे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहतात.

संबंधित महाविद्यालयांशी सपर्क केल्यानंतर अर्ज फॉरवर्ड करण्यात तत्परता असते; परंतु विद्यार्थ्यांकडून त्रुटीची वेळेत पूर्तता न केल्यामुळे पुढील कार्यवाही रखडते आणि अर्ज महाविद्यालय स्तरावर रखडतात.

----------

एससी प्रवर्गातील किती अर्ज ऑनलाइन सादर - १६६४६

समाजकल्याण विभागाने निकाली काढले - १५६१९

महाविद्यालयात प्रलंबित- १०२७

व्हीजेएनटी प्रवर्गातील किती अर्ज ऑनलाइन सादर - ३०६५०

समाजकल्याण विभागाने निकाली काढले - २९००९

महाविद्यालयात प्रलंबित- १६४१

----------

Web Title: Thirteenth month of drought! Post-matric scholarship application stuck in college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.