‘टीएचओं’चे नियोजन शून्य; आरोग्य सेवा विस्कळीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:56 PM2019-11-06T23:56:04+5:302019-11-06T23:56:55+5:30
कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आता टीएचओंनाही शिस्त लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. याचा सर्व फटका जनतेस सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीड : जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य सेवा गत काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे नियोजन आणि वचक नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. कामचुकार वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच आता टीएचओंनाही शिस्त लावण्याचे आव्हान वरिष्ठांसमोर आहे. याचा सर्व फटका जनतेस सहन करावा लागत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात ५१ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २८० उपकेंद्र आहेत. अपवादात्मक वगळता प्रत्येक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नियोजन करण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक तालुका आरोग्य अधिकारी आहे. मात्र, त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. स्वत: मुख्यालयी थांबत नाहीत, साधे जातही नाहीत. त्यामुळेच कामचुकार व अॅडजेस्टमेंट करणाºया वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना अभय आहे.
सीईओंच्या आदेशाला केराची टोपली
नव्याने रूजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी सुरूवातीलाच बैठक घेऊन दोन्ही वैद्यकीय अधिका-यांनी मुख्यालयी राहून सेवा देण्याचे आदेश दिले होते.
तसेच टिचओंनी त्यांची नियमित हजेरी घेऊन अहलवाल देण्यास सांगितले होते. मात्र, टिचओंकडून सीईओंच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली.
प्रत्यक्षात ना कोणी मुख्यालयी राहते ना कोणी नियमित कर्तव्य बजावते. यात काही टिचओंचा देखील समावेश आहे.
म्हणे, बातम्यांनी काही फरक पडत नाही
माध्यमांनी आरोग्य विभागातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्यावर काही टिचओंच्या पायाखालची जमीन सरकली. बातम्या छापल्याने आम्हाला काही फरक पडत नाही.
आमच्याबद्दल वरिष्ठांना सर्व माहिती आहे. ते आम्हाला काहीच करू शकत नाहीत, अशा अविर्भावात काही टिचओ आहेत. त्यामुळे आता वरिष्ठही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.