‘त्या’ आरोपींना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:58+5:302021-08-27T04:36:58+5:30

.... नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर बीड : शहरातील विविध भागांमध्ये नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे पाणी रस्त्यांवरून वाहत असून, यामुळे ...

‘Those’ accused are in judicial custody | ‘त्या’ आरोपींना न्यायालयीन कोठडी

‘त्या’ आरोपींना न्यायालयीन कोठडी

Next

....

नाल्या तुंबल्याने पाणी रस्त्यावर

बीड : शहरातील विविध भागांमध्ये नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे पाणी रस्त्यांवरून वाहत असून, यामुळे दुर्गंधी पसरत आहे. रोगराईलाही निमंत्रण मिळत आहे. स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सुखवसे यांनी केला आहे.

....

रस्ता तत्काळ दुरुस्त करावा

बीड : शहरातील नगर रोडची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे चुकविताना अपघातांचा धोका वाढला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ललित आब्बड यांनी केली आहे.

....

भररस्त्यातील पार्किंगमुळे पादचाऱ्यांना त्रास

बीड : शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेत ऐन मधोमध दुचाकी, चार चाकी वाहने उभी केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून, वाहतुकीची कोंडीही होत आहे. वाहनचालकांच्या बेशिस्तीचा सामान्यांना फटका सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिसांची डोकेदुखीही वाढल्याचे चित्र आहे.

Web Title: ‘Those’ accused are in judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.