मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2024 03:45 AM2024-10-13T03:45:01+5:302024-10-13T03:46:04+5:30
जिंकल्यावर मला लोकांनी इज्जत दिली. परंतु पराभव झाल्यानंतर त्यापेक्षाही जास्त इज्जत मिळाली. आताग डबड न करता आपल्याला डाव खेळायचे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या.
बीड : लोकसभा निवडणुकीत गडबड झाली; पण ती पुसून टाकायची आहे. आता राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरा करणार असून वंचित, दलित, पीडितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेतला जाईल, असा इशारा भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांनी दिला. दरम्यान, परंपरेनुसार चालत आलेल्या दसरा मेळाव्याला पहिल्यांदाच धनंजय मुंडे हजर होते.
पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर शनिवारी परंपरेनुसार दसरा मेळावा घेण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची खदखद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. यावेळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे, माजी मंत्री महादेव जानकर यांच्यासह आजी-माजी आमदारांची उपस्थिती होती.
जिंकल्यावर मला लोकांनी इज्जत दिली. परंतु पराभव झाल्यानंतर त्यापेक्षाही जास्त इज्जत मिळाली. आताग डबड न करता आपल्याला डाव खेळायचे आहेत, असेही पंकजा म्हणाल्या.
वेगळा मेळावा घेण्याचा विचार आला नाही
-पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या मेळाव्याला पहिल्यांदाच हजेरी लावली. भगवान गडाला, त्यांच्या भक्ताला, स्व. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे आणि माझ्या नशिबी कायमच संघर्ष आला. परंपरेच्या पाठीशी उभा राहण्यासाठी मी या मेळाव्याला आलो.
-१२ वर्षे मला या ठिकाणी येण्यासाठी जमले नाही; पण वेगळा दसरा मेळावा घेण्याचा कधी विचारही मनात आला नाही. कारण ज्याला वारसा दिलाय, त्याने तो पूर्ण मंत्री मुंडे म्हणाले.
ओबीसी आंदोलक हाके, वाघमारे हजर
ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनीही हजेरी लावली. भविष्यात या गडावर संत बाळूमामा, पोहरादेवी, खंडोबा, बिरूबा यांचीही पालखी आल्याशिवाय राहणार नाही, असे हाके म्हणाले.
जातीवर स्वार होणाऱ्याच्या मागे जाऊ नका
अपघात झाल्यावर चालकाची, अत्याचार झाल्यावर मुलगी आणि आरोपीची जात विचारतात. असा समाज घडवण्यासाठी आम्ही आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाहीत. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर बघून काम द्यायचे आहे. जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्याही पाठीमागे उभे राहायचे नाही, असेही पंकजा यांनी म्हटले.