महिन्याला हजारांवर सिटीस्कॅन; शासकीय दर नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:33 AM2021-04-10T04:33:04+5:302021-04-10T04:33:04+5:30

बीड : कोरोना संशयित रूग्णांना सिटीस्कॅन करणे जवळपास बंधनकारकच केले आहे. एका सिटीस्कॅनसाठी खाजगी केंद्रावर तीन ते पाच हजार ...

Thousands of CT scans per month; Government rates in name only | महिन्याला हजारांवर सिटीस्कॅन; शासकीय दर नावालाच

महिन्याला हजारांवर सिटीस्कॅन; शासकीय दर नावालाच

Next

बीड : कोरोना संशयित रूग्णांना सिटीस्कॅन करणे जवळपास बंधनकारकच केले आहे. एका सिटीस्कॅनसाठी खाजगी केंद्रावर तीन ते पाच हजार रूपयांपर्यंत दर आकारला जात आहे. रोज हजारपेक्षा जास्त सिटीस्कॅन जिल्ह्यातील विविध केंद्रावर होत आहेत. यात सामान्यांची आर्थिक लूट होत आहे. बीड शहरात मात्र, संघटनेने सरसकट २५०० रूपये दर निश्चित केल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात ८ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण सापडला. त्यानंतर ज्यांना ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे आहेत त्यांची कोरोना चाचणी बंधनकारक केली. तसेच खाजगी रूग्णालयात गेल्यावर सिटीस्कॅन करणे जवळपास बंधनकारक असल्यासारखे लिहून दिले जात असे. आताही असाच काहीसा प्रकार सुरू आहे. असे असले तरी खाजगी डायग्नोस्टीक सेंटरकडून शासकीय दरापेक्षाही जास्त पैसे घेतले जातात. यात सामान्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. एका सिटीस्कॅनसाठी गतवर्षी चार ते पाच हजार रूपये बीड शहरात घेतले जात होते. आता २५०० रूपये दर आकारला आहे. तर अंबाजोगाईत आजही ३ हजार रूपयांपेक्षा जास्त दर आकारले जात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शासनाने निश्चित केलेले दर कागदावरच असून प्रत्यक्षात भरपूर लूट होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आराेग्य विभागाने या सेंटरची अचानक तपासणी करून निश्चीत केलेल्या दराप्रमाणे शुल्क आकारण्याबाबत सुचना कराव्यात, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.

बीडमध्ये २५०० रूपये दर

बीडमध्ये सुरूवातीला २५०० ते ५ हजार रूपयांपर्यंत एका सिटीस्कॅनला दर आकारले जात होते. परंतु मागील काही दिवसांपासून शहरातील पाच डायग्नोस्टीक सेंटरने एकत्र येत सरसकट २५०० रूपये दर आकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्हा रूग्णालयात ४४२१ तपासणी

जिल्हा रूग्णालयात ८ एप्रिल २०२० पासून ते मार्च अखरेपर्यंत ४ हजार ४२१ लोकांचे सीटीस्कॅन केले आहे. एका सीटीस्कॅनला सरासरी २५०० रूपये याप्रमाणे शुल्क पकडल्यास आतापर्यंत १ कोटी १० लाख ५१ हजार ५०० रूपये सामान्यांचे वाचले आहेत. येथील विभाग प्रमुख डॉ.संतोष जैन, क्ष-किरण तंत्रज्ञ अशोक नांदे, सिद्धेश्वर गायके, गणेश गायकवाड आदी येथे कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूर्यकांत गित्ते हे मार्गदर्शन करीत आहेत.

अंबाजोगाईत ४ दिवस मशीन बंद

अंबाजोगाईतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाती सीटीस्कॅन मशीन चार दिवस बंद होती. त्यामुळे शहरातील एकमेव असणाऱ्या खाजगी केंद्रावर तपासणीसाठी गर्दी झाली होती. शासनाचे दर ३ हजार रूपयांपर्यंत असतानाही येथे ३५०० पासून पाच हजार रूपयांपर्यंत शुल्क घेतल्याचे सूत्रांकडून समजते. यावर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

मार्च २०२१ मध्ये सर्व विक्रम मागे

मार्च २०२१ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक १४४२ लोकांचे सीटीस्कॅन करण्यात आले आहे. हा आतापर्यंतचा विक्रम राहिला आहे. तसेच २०२० मधील ऑक्टोबरमध्येही ७०० चा आकडा ओलांडला होता. त्यानंतर सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये सार्वाधिक तपासणी झाल्या होत्या.

कोट

जिल्हा रूग्णालयात डॉक्टरांनी ॲडव्हाईज केली की सीटीस्कॅन केले जाते. संशयित असो वा कोरोनाबाधित आम्ही सर्व काळजी घेऊन तपासणी करतोत. माझ्यासह टिमकडून सामान्यांना कसलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाते. एकच मशीन असल्याने थाेडा उशिर लागतो, मात्र कोणाला थांबविले जात नाही.

डॉ. संतोष जैन, क्ष-किरण तज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय बीड

---

जिल्हा रूग्णालयात महिनानिहाय तपासणी

एप्रिल २०२० - ७३

मे ९४

जून/जुलै ०

ऑगस्ट ६६

सप्टेंबर ४०७

ऑक्टोबर ७३९

नोव्हेंबर ४६६

डिसेंबर ३९१

एकूण २२३६

--

जानेवारी २०२१ - ३७७

फेब्रुवारी ३६६

मार्च १४४२

एकूण २१८५

----

शासनाने निश्चित केलेले दर

१६ स्लाईसखालील सिटी स्कॅन - २००० रुपये

१६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅन - २५०० रुपये

६४ पेक्षा अधिक स्लाईस सिटी स्कॅन - ३००० रुपये

===Photopath===

090421\092_bed_10_09042021_14.jpg

===Caption===

डॉ.संतोष जैन, क्ष-किरण तज्ज्ञ जिल्हा रूग्णालय बीड

Web Title: Thousands of CT scans per month; Government rates in name only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.