सोयाबीन विम्यापासून हजारो शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:43 PM2019-07-26T23:43:34+5:302019-07-26T23:44:37+5:30
जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे.
बीड : जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकरी सोयाबीन पीक विम्यापासून वंचित राहणार आहेत. ‘ओव्हर इन्शुरंन्स’ च्या कारणाखाली शेतकऱ्यांना पीक विमा नाकारला आहे. बुधवारी पीक विम्याची माहिती विचारण्यासाठी गेल्यावर अधिकारी, कर्मचाºयांनीही उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनी कार्यालयात गोंधळ घातला. शासनाने दुष्काळात शेतकºयांची थट्टा मांडल्याचे दिसत आहे.
कृृषी विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १४ लाख ११ हजार शेतकºयांनी सहभाग नोंदविलेला आहे. तूर, उडीद, मुगाचा विमा शेतकºयांना मिळालेला आहे. मात्र, सोयाबीन विम्यासाठी मागील महिनाभरपासून शेतकरी त्रस्त आहेत. आज, उद्या करून विमा कंपनीकडून शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात होते. अखेर गुरूवारी जिल्ह्यातील बहुतांश शेतकºयांना सोयाबीनचा विमा प्राप्त झाला. मात्र, काही शेतकºयांना ‘ओव्हर इन्शुरंन्स’चे कारण पुढे करीत विमा नाकारला आहे.
योग्य विमा भरल्यानंतरही आपल्याला विमा न मिळाल्याने शेतकºयांनी ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. येथील अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शेतकरी संतापले होते. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. समजूतीनंतर शेतकºयांचा राग शांत झाला.
दरम्यान, अगोदरच दुष्काळ अन् त्यात यावर्षी पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यातच आता विमा कंपनीकडून शेतकºयांच्या दुखा:वर मीठ चोळण्याचे काम होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. सोयाबीनचा विमा सरकट वाटप करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.
कंपनीच्या अधिकारी, कर्मचाºयांची अरेरावी
आष्टी, परळी, अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी शेकडो किलोमिटर अंतर कापून बीडच्या ओरिएन्टल इन्शुरंन्स कंपनीच्या कार्यालयात विम्याची माहिती विचारण्यासाठी आले होते.
येथे शेतकºयांना माहिती देण्याऐवजी अधिकारी, कर्मचाºयांनी अरेरावी करीत त्यांना बाहेर काढले. यामुळेच शेतकरी संतापल्याचे सांगण्यात आले.
काही शेतकºयांनी तर आपला रूद्रावतार दाखविण्यास सुरूवात केली. मात्र इतरांनी त्यांना वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. कंपनीच्या मुजोर अधिकारी, कर्मचाºयांनी शेतकºयांची थट्टा मांडल्याचा आरोप होत आहे.