केज तहसीलवर धडकला हजारो महिलांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:36 AM2021-08-27T04:36:47+5:302021-08-27T04:36:47+5:30

बीड : महिलांना घर, संपत्तीत बरोबरीचा हिस्सा द्यावा, त्यांना त्यांचे हक्क प्रदान करावेत, या मागणीसाठी महिला अधिकार मंच, ...

Thousands of women marched on Cage tehsil | केज तहसीलवर धडकला हजारो महिलांचा मोर्चा

केज तहसीलवर धडकला हजारो महिलांचा मोर्चा

googlenewsNext

बीड : महिलांना घर, संपत्तीत बरोबरीचा हिस्सा द्यावा, त्यांना त्यांचे हक्क प्रदान करावेत, या मागणीसाठी महिला अधिकार मंच, महाराष्ट्र संघटनेच्या वतीने केज तहसील कार्यालयावर २६ ऑगस्ट रोजी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.

शासन महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठमोठे कायदे करते मात्र , प्रत्यक्षात त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने संपत्तीत हक्क द्यावा, महिलांच्या नावावर घर-जमीन करून देण्याच्या मोहिमेला अधिक गती द्यावी,

अशा मागण्या लावून धरण्यात आल्या.

याप्रसंगी महिला अधिकार मंचच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा घुले म्हणाल्या , कोरोनाच्या संकटामुळे अनेक महिलांच्या हाताला काम नाहीत, अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, अशी आवस्था असताना देखील गावात वेळेवर स्वस्त धान्य मिळत नाही. अनेक महिलांनी रेशन कार्डची मागणी करूनही दिले जात नाही. याबाबत प्रशासन देखील दुर्लक्ष करत आहे. याशिवाय महिलांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गर्भाशय शस्त्रक्रिया झालेल्या तसेच गोरगरीब महिलांना निवृत्ती वेतन लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. ओमप्रकाश गिरी, रजनीताई काकडे, लक्ष्मी बोरा , ज्योती साखरे , गौरी शिंदे,महादेव जोगदंड , शिवदास काळुंके , लक्ष्मण हजारे यांनी मार्गदर्शन केले . केज तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

...

मोर्चाने वेधले लक्ष

केज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरु झालेला मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. महिलांनी न्याय व हक्कासाठी विविध मागण्या करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी शहर दणाणून गेले.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी कौशल्या थोरात, दीपाली गळांगे,प्रतीभा देशमुख,सुप्रिया सिरसट, वंदना कांबळे,सुनीता घुले यांनी परिश्रम घेतले.

260821\26bed_15_26082021_14.jpg

मोर्चा

Web Title: Thousands of women marched on Cage tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.