अतिवृष्टीमुळे अरणवाडी तलावास धोका; सांडवा पुन्हा फोडण्याची पाटबंधारे विभागाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 02:12 PM2021-09-06T14:12:49+5:302021-09-06T14:18:02+5:30
Rain in Beed : तलावाचे काम जुने व नवे एकत्रित असल्याने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
धारूर ( बीड ) : तालूक्यातील अरणवाडी साठवण तलावास अतिवृष्टीमुळे धोका निर्माण झाला आहे. तलावाच्या पश्चिमेस असणाऱ्या विहीरीजवळील भाग खचल्याने साठवण तलाव फुटण्याची भिती निर्माण झाली आहे. तलावातील पाणी कमी करण्यासाठी सांडवा पुन्हा फोडण्याची पाळी येणार आहे. यामुळे पाटबंधारे विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले असून या तलावाखाली येणारे गावात भितीचे वातावरण आहे.
धारूर तालूक्यातील अरणवाडी साठवण तलाव यावर्षी पूर्ण झाला. तलावात पहिल्याच वर्षी पाणीसाठा चांगला झाल्याने तलावाला धोका होऊ नये या भितीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी 25 जुलैला सांडवा फोडला. माञ, या तलावाखालील पाच गावाच्या आंदोलनामुळे सांडवा पुन्हा 7 ऑगस्टला पुर्ववत बांधण्यात आला. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे तलाव पुन्हा भरगच्च भरला आहे. तलावाचे काम जुने असल्याने तलावाच्या खाली पश्चिमेकडे असणाऱ्या विहीरीजवळील भाग खचण्यास सुरूवात झाली आहे. काळीमाती व गढूळ पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. तलाव फुटण्याची भिती निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे तलावाखालील गावांमध्ये भिती निर्माण झाली आहे.
पुन्हा सांडवा फोडण्याची तयारी
तलावाचे काम जुने व नवे एकत्रित असल्याने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, तलावाच्या सुरक्षितेसाठी सांडवा पुन्हा फोडण्याची तयारीत पांटबंधारे विभाग आहे. ग्रामस्थांनी सुरक्षीतता बाळगून पाटबंधारे विभागास सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता यु. व्हि वानखेडे यांनी केले आहे.
हेही वाचा -
- करुणा शर्मा यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी
- पिस्तूलाचे गूढ कायम ! करूणा शर्माच्या गाडीत पिस्तूल होते की ठेवले?