खटला मागे घेण्यासाठी तलवार दाखवून दमबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:15 AM2018-12-09T00:15:28+5:302018-12-09T00:16:13+5:30

दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी एकाच्या सांगण्यावरून १८ जणांनी एका मजुराच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखवत दमबाजी केली.

Threatening by showing a sword to retract the case | खटला मागे घेण्यासाठी तलवार दाखवून दमबाजी

खटला मागे घेण्यासाठी तलवार दाखवून दमबाजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दाखल केलेला खटला मागे घेण्यासाठी एकाच्या सांगण्यावरून १८ जणांनी एका मजुराच्या घरात घुसून तलवारीचा धाक दाखवत दमबाजी केली. यावेळी मजुराला शिवीगाळ आणि मारहाणही करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री बीड शहरातील खडकपुरा भागात घडली. या घटनेनंतर पेठ बीड पोलिसांनी घेतलेल्या झाडाझडतीत एका व्यक्तीकडे तलवार आणि एकाकडे खंजीर आढळून आल्याने पोलिसांनी त्यांच्यावरही स्वतंत्र गुन्हे दाखल केले.
खडकपुरा भागात राहणाऱ्या मनोहर उर्फ मनोज लक्ष्मण गोडसे याने बाळू गुंजाळ याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली होती. शुक्रवारी बाळूचा वाढदिवस असल्याने गल्लीतील मुलांनी चौकात डीजे वाजवत त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यांनतर रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गल्लीतील आत्माराम उर्फ अंबादास तुकाराम गुंजाळ, योगेश आत्माराम गुंजाळ, दत्ता शहादेव जाधव, नितीन विलासराव गरड, अमोल लोंढे, सुजीत अशोक गुंजाळ आणि अन्य १० ते १२ जण गोडसे यांच्या घरात घुसले. त्यांच्यापैकी योगेश गुंजाळ व अमोल लोंढे यांच्या हातात तलवार होती. आम्हाला बाळू गुंजाळ याने पाठविले असून ‘तू त्याच्यावर दाखल केलेला खटला मागे का घेत नाहीस’ असे म्हणत तलवारीचा धाक दाखवत जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच शिवीगाळ केली. यावेळी वीट लागल्याने गोडसे किरकोळ जखमी झाले. गोडसे यांनी पेठ बीड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून १८ जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु आहे.
झाडाझडतीत जप्त केली तलवार
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या सूचनेनुसार पेठ बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.एस. उदावंत, कर्मचारी प्रेमदास साळवे, जाधव, अलगट, सानप, महिला पोलीस सोनवणे शहरातील विविध भागात जाऊन झाडाझडती घेत अवैधरित्या शस्त्र बाळगणा-यांवर कारवाई केली. रात्री ११.२५ वाजता नाळवंडी रोड येथे राहणाºया धर्मराज उर्फ बाळासाहेब लक्ष्मण गुंजाळ याच्या घरी पोलीस झडतीसाठी गेले असता त्याने विरोध केला. त्याचा विरोध झुगारून पोलिसांनी घराची झडती घेतली असता त्यांना दरवाजामागे एक तलवार लपवून ठेवलेली आढळून आली. पोलिसांनी तलवार जप्त केली असून गुंजाळवर शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
खंजीर बाळगणा-यावर गुन्हा
कंबरेला खंजीरसारखे घातक शास्त्र लावून एक इसम दुचाकीवरुन (एमएच २० डीएक्स ४६१७) पेठ बीड हद्दीत फिरत असल्याची माहिती गस्त पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस कर्मचारी गणेश जगताप आणि कापले यांनी रात्री ११.१५ वाजता रविवार पेठेत जाऊन सदरील इसमास हटकले. चौकशी दरम्यान त्याने स्वत:चे नाव शहजादखान उमरखान पठाण (वय २८ वर्षे, रा. ख्वाजानगर, खासबाग, बीड) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला खंजीर आढळून आला. पोलिसांनी शहजादखानला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा नोंदविला असून खंजीर आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Threatening by showing a sword to retract the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.