सीएसपी सेंटर मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:36+5:302021-08-02T04:12:36+5:30

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य प्रबंधक चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील रहिवासी शेख जुनेद ...

Threatens bank officials to get CSP center | सीएसपी सेंटर मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना धमकी

सीएसपी सेंटर मिळविण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना धमकी

Next

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मुख्य प्रबंधक चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील रहिवासी शेख जुनेद शेख नसीर यांनी बँकेचे ग्राहक सेवा केंद्र अर्थात सीएसपी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अर्जानुसार बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व चौकशी केल्यानंतर शेख जुनेद यांच्या असमाधानकारक आर्थिक व्यवहारामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी नियमानुसार त्यांचा अर्ज नामंजूर केला व अर्जदारालाही तसे कळविण्यात आले. मात्र, शेख जुनेद यांनी १० जुलै रोजी बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे सीएसपी सेंटर नाकारल्याबद्दल स्थानिक शाखाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करणारा अर्ज केला. नाकारलेले सीएसपी सेंटर गैरमार्गाने मंजूर करून घेण्यासाठी दबाव तंत्र वापरून आत्महत्येची धमकी देणे, हा गुन्हा आहे. विनाकारण आरोप करून बँकेची बदनामी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे प्रबंधक चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Threatens bank officials to get CSP center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.