वीज ग्राहकांकडे साडेतीन कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 23:43 IST2019-11-21T23:42:05+5:302019-11-21T23:43:06+5:30
तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

वीज ग्राहकांकडे साडेतीन कोटी थकले
आष्टी : तालुक्यामध्ये सध्या वीज महामंडळाने व थकबाकीचे सक्ती केली असून गुरुवारी दिवसभर जनमित्राद्वारे थकबाकीची वसुली केली जात आहे. जवळपास ८६६ ग्राहकांकडे ३.५७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांकडून वसुली करण्याचे आदेश मुख्य अभियंत्यांनी जनमित्रांना दिले आहेत.
शहरात मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी आष्टी उपविभाग येथे सर्व जनमित्रांना वीज बिल वसुलीसाठी आदेशित केले. एचओ लिस्ट २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या वीज ग्राहकाकडून थकीत बिल भरून घेणेसाठी आदेश दिले आहे. सदरील थकबाकी यादीत ८६६ ग्राहक असून, थकबाकी ३.५७ कोटी आहे. ही थकबाकी २५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आष्टी तालुक्यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्य व सार्वजनिक दिवाबत्तीची एकूण १२.३९ कोटी थकबाकी आहे. आष्टी महावितरण तर्फे अधिकृत वीजपुरवठा घेऊन वीज गळती थांबवणेसाठी तसेच वीज बिल भरावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता प्रवीण पवार, सहाय्यक अभियंता चंदन पांडे यांनी केले आहे.