वृद्धेच्या घरावर छापा टाकून साडेतीन किलो गांजा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:29+5:302021-09-26T04:36:29+5:30
बीड : शहरातील पेठ बीड भागात वृद्धेच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३५ हजार रुपयांचा ...
बीड : शहरातील पेठ बीड भागात वृद्धेच्या घरावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ३५ हजार रुपयांचा साडेतीन किलो गांजा जप्त करण्यात आला. यावेळी महिलेला अटक करण्यात आली. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
बार्शी नाका परिसरातील रहिमदबी अमानुल्ला पठाण ( ६०) ही महिला स्वतःच्या घरातून बेकायदेशीरपणे अंमली पदार्थ असलेल्या गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाली. त्यानुसार सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास वाजताच्या सुमारास छापा मारला. घराची झडती घेतली असता पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजूस एक पॅकबंद आणि एक अर्धे उघडलेल्या पाकिटात एकूण ३४ हजार ६४० रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून वृद्धेस अटक केली. उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत यांच्या फिर्यादीवरून रहिमदबी पठाण हिच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.