भाजपचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य फुटला; बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:00 AM2020-01-05T00:00:10+5:302020-01-05T00:00:58+5:30

अनिल भंडारी । लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अनेक दिवसांपासून उत्कंठा लागलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत ...

Three BJP, one Congress member split; Power in Beed Zilla Parishad | भाजपचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य फुटला; बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर

भाजपचे तीन, काँग्रेसचा एक सदस्य फुटला; बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर

Next
ठळक मुद्देनिकालाचा लखोटा सीलबंद । महाविकास आघाडीला तीन माजी सभापतींसह शिवसेनेच्या चार सदस्यांचेही समर्थन

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अनेक दिवसांपासून उत्कंठा लागलेल्या बीडजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीने आपले बळ दाखविले. अपक्ष एक, भाजपचे तीन, शिवसेनेचे चार, कॉँग्रेसचे दोन अशा दहा सदस्यांनी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांच्या बाजुने आपले समर्थन दिल्याने महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले. १३ जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करु नये असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने दिलेले आहेत. त्यामुळे अधिकृत निकाल जाहीर होण्यास काही दिवसांचा अवधी आहे. मात्र राज्यातील सत्तेच्या बाजुने बीड जिल्हा परिषद जाते, हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. बीड जिल्हा परिषदेचा निकाल सीलबंद लखोट्यात कोषागारमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक शनिवारी झाली. तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. मंत्री धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद येथे डावपेचानुसार मोर्चेबांधणी केली होती. त्याचवेळी शिवसेना महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसून आले होते. तर भाजपचे तीन व कॉँग्रेसचे दोन सदस्य महाविकास आघाडीने राजकीय मुत्सद्देगिरीतून सोबत घेतल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे या निवडणुकीत चुरस अथवा कसदार स्पर्धा जाणवली नाही.
दुपारी एकच्या सुमारास राष्टÑवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट व उपाध्यक्षपदाचे उमेदवार बजरंग सोनवणे हे सूचक, अनुमोदक यांच्यासमवेत सभागृहात गेले. परतल्यानंतर दोघांनी उमेदवारी दाखल केल्याचे सांगितले. तर पावणेदोनच्या सुमारास भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. योगिनी थोरात पोहचल्या. काही वेळाने भाजपचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार भारत काळेसह सदस्य तसेच राष्टÑवादीचे इतर सदस्य सभागृहात पोहचले. पीठासीन अधिकारी प्रविणकुमार धरमकर यांच्या उपस्थितीत विशेष सभेतील निवडणूक प्रक्रिया इनकॅमेरा पार पडली. हात वर करुन मतदान झाले. निवडणूक निकाल सीलबंद लखोट्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
सभेनंतर परतताना महाविकास आघाडीच्या सदस्यांचे चेहरे फुलले होते. त्यावरुनच जि. प. मधील सत्तांतराबाबत संकेत मिळत होते. तर नगर रोडवर फटाके फोडून गुलाल उधळण्यात येत होता. दरम्यान १३ जानेवारीनंतर निकाल जाहीर झाल्यावरच कळेल, असे सावध उत्तर शिवकन्या सिरसाट व बजरंग सोनवणे यांनी दिले.
महाविकास आघाडीचे पारडे जड
भाजपच्या बाजुने भाजपचे १९, १ कॉँग्रेस व १ अपक्ष असे २१ सदस्य राहिल्याचे तर महाविकास आघाडीसोबत राष्टÑवादीचे २०, शिवसेनेचे ४, काकू- नाना आघाडीचे २, भाजप ३, अपक्ष १ आणि कॉँग्रेसचे २ असे एकूण ३२ सदस्य राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र अधिकृत निकालानंतरच जि. प. ची सत्ता कोणाकडे हे स्पष्ट होईल.

Web Title: Three BJP, one Congress member split; Power in Beed Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.