दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 09:45 PM2022-02-26T21:45:13+5:302022-02-26T21:45:25+5:30

अंबाजोगाई तालुक्यातील बागझरीतील धारासुरे कुटुंबावर काळाचा घाला 

three children and mother died due to food poisoning in beed | दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त

दुर्दैवी! विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू; हसतंखेळतं कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त

Next

अंबेजोगाई - तालुक्यातील बागझरी गावात राहणार्‍या धारासुरे कुटुंबावर शनिवारी सकाळी काळ धावून आला. अंड्याची भाजी खाल्ल्याने विषबाधा होऊन आई, दोन मुलींसह आठ महिन्याचा मुलाचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भाग्यश्री काशिनाथ धारासुरे (वय २८), साधना काशिनाथ धारासुरे  (वय ०६), श्रावणी काशिनाथ धारासुरे  (वय ०४) आणि नारायण काशीनाथ धारासुरे (८ महिने) अशी विषबाधेने मृत्यू झालेल्या आई आणि चिमुकल्यांची नावे आहेत. बागझरी येथील काशिनाथ दत्तू धारासुरे (वय ३१) हे शेतकरी आहेत. शुक्रवारी (दि.२५) रात्री त्यांची पत्नी भाग्यश्रीआणि मुलांनी अंड्याची भाजी खाल्ली. या जेवणातून त्यांना विषबाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळच्या सुमारास पत्नी आणि मुलांना विषबाधा झाल्याची शंका काशिनाथ यांना आली. त्यांनी तातडीने चौघांना स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी  दाखल केले. यावेळी उपचार सुरु असताना साधना आणि श्रावणी यांचा आधी मृत्यू झाला. चिमुकल्या नारायणने त्यानंतर तासाभराने प्राण सोडले. तर रात्री ९ भाग्यश्री यांचाही  मृत्यू झाला. या घटनेने धारासुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सायंकाळी झाले अंत्यसंस्कार
तिन्ही मयत चिमुकल्यांचे शनिवारी दुपारी शवविच्छेदन करण्यात आले असून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता बागझरी येथे तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, बर्दापूर पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.

Web Title: three children and mother died due to food poisoning in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.