इतिहास संकलन संस्थेतर्फे तीन दिवसीय व्याख्यानमाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:28 AM2021-01-17T04:28:49+5:302021-01-17T04:28:49+5:30
दुसरे विचार पुष्प राजमाता जिजाऊ संगीत एकपात्री नाट्यप्रयोग चैताली खटी यांनी सादर केला. या कार्यक्रमास ...
दुसरे विचार पुष्प राजमाता जिजाऊ संगीत एकपात्री नाट्यप्रयोग चैताली खटी यांनी सादर केला. या कार्यक्रमास अध्यक्ष सीमा नानावटी होत्या. सूत्रसंचालन प्रा. अनिता शिंदे, तर आभार प्रदर्शन प्रा. गणपत गट्टी यानी केले.
तिसरे विचार पुष्प प्रा. डॉ. विवेक मिरगणे यांनी गुंफले. स्वामीजी एक शक्ती विचार प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. आजही समाजास त्यांचे विचार प्रेरणा देणारे होय. शब्दगंधाच्या माध्यमातून विचार सुगंध हृदयापर्यंत पोहचतो. या पद्धतीने व्याख्यान ऐकल्यास त्या व्यक्तिमत्वाशी मिसळून जातो अशा पद्धतीने स्वामी विवेकानंद श्रोत्याशी संवाद साधत असत. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक, प्रेरणास्रोत, शक्तीस्रोत होते, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. जयश्री कुलकर्णी या होत्या. सूत्रसंचालन प्रा. शशिकांत पसारकर, तर आभार प्रदर्शन प्रा. डाॅ. शांता जाधवर यांनी केले.
व्याख्यानमालाचे संयोजन, नियोजन, तांत्रिक बाब प्रा. शांता जाधवर, प्रा रवि सातभाई, प्रा. शशिकांत पसारकर यांनी प्रयत्न केले. यासाठी प्रांताध्यक्ष डाॅ. राधाकृष्ण जोशी, प्रशांत साबळे, रवींद्र पाटील, राजेश विर्धे यांचे मार्गदर्शन लाभले. इतिहास संकलन संस्था बीडच्या कार्यकारिणी सदस्यांनी व्याख्यानमालेस प्रतिसाद दिला.