सोलारपंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:25 PM2024-02-08T16:25:58+5:302024-02-08T16:26:36+5:30

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three lakh fraud of a farmer in the name of installing solar pump | सोलारपंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक

सोलारपंप बसवून देण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक

- नितीन कांबळे
कडा:
मोबाईलच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर शेतकऱ्याचा विश्वास संपादन करत सोलारपंप बसवून देण्याचे आमिष देत तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील गणगेवाडी येथील शेतकरी महादेव शामराव गणगे याची आक्टोबर-नोव्हेंबर २०२३ या कालावधीत सोलरपंप बसवून देणाऱ्या कंपनीतील राहुल धोंडीराम जरांगे याच्याशी ओळख झाली. जरांगेने गणगेवाडी येथे येवून गणगे यांची भेट घेत तुम्हाला सोलरपंप बसवून देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी जरांगे याने आक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन पदध्तीने ३ लाख २८ हजार रूपये घेतले. मात्र, गणगे यांना त्याने सोलरपंप बसवून दिला नाही. 

दरम्यान, वारंवार फोन करून देखील जरांगे काहीच प्रतिसाद देत नव्हता. यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गणगे यांनी बुधवारी आष्टी पोलिस ठाणे गाठले.  शेतकरी गणगे यांच्या तक्रारीवरून राहुल धोंडीराम जरांगे (गाव माहीत नाही) याच्या विरोधात फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे करीत आहेत.

Web Title: Three lakh fraud of a farmer in the name of installing solar pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.