तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:26 AM2018-10-04T00:26:59+5:302018-10-04T00:27:25+5:30

माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three Marriage Persons; Offense against father-in-law | तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा

तीन विवाहितांचा छळ; सासरच्यांविरोधात गुन्हा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी तीन विवाहितांचा छळ झाला. या घटना माजलगाव ग्रामीण, बीड शहर व पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडल्या. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षा विकत घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये घेऊन ये, असे म्हणत तमन्न शरिफ शेख (२३ रा.पिंपळनेर) या विवाहितेचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर दुसरे लग्नही केले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात शरीफ आमीर शेख, नफोसा अमन शेख, आरेफ अमर शेख, शबाना आरेफ शेख, निसार टेलर, मुमताज निसार (सर्व रा.इस्लामपुरा, बीड) विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरी घटना बीड शहर ठाणे हद्दीत घडली. ट्रक व दुचाकी घेण्यासाठी दोन लाख रूपये घेऊन ये म्हणून शेख उमेसलमा शोयब (१९ रा.झमझम कॉलनी, बीड) या विवाहितेस सासरच्यांनी उपाशी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख शोयब शेख बाबू, शेख बाबू शेख बिसमिल्ला, अफशान बेगम शेख बाबू, शेख मजहर शेख बाबु (सर्व रा.ब्रह्मगाव ता.गेवराई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दारूड्या पतीकडून मारहाण
ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून ३ लाख रूपये घेऊन ये असे म्हणून कविता रामेश्वर भाकरे (३० रा.लवूळ क्र.१ ता.माजलगाव ह.मु.लिंगसा ता.परतूर जि.जालना) या विवाहितेस सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच पती रामेश्वर हा दारूडा असून तो नेहमीच कविताला मारहाण करीत असे. तसेच कवितासह तिच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात रामेश्वर भाकरे, मीराबाई भाकरे, अभिमान भाकरे, शाम भाकरे, अश्विनी भाकरे, भाग्यश्री भाकरे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Three Marriage Persons; Offense against father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.