दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:13 AM2020-01-07T01:13:47+5:302020-01-07T01:14:03+5:30
नामलगाव फाट्याजवळून ५ जानेवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहराजवळील नामलगाव फाट्याजवळून ५ जानेवारी रोजी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून त्यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडा प्रतिबंधक पथकाचे प्रमुख सपोनि गजानन जाधव व त्यांचे सहकारी रविवारी पोट्रोलिंग करत होते. त्यावेळी नामलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डानपुलाच्या खाली काहीजण महामार्गावर गाड्या अडवून लुटमार करत दरोडा टाकण्याच्या तयारी होते. अशी महिती खबऱ्यामार्फत दरोडाप्रतिबंधक पथकाला मिळाली होती. याप्रकरणाची माहिती जाधव यांनी पोलीस नियंत्रण ५ जानेवारी रोजी १० वाजण्याच्या सुमरास कक्षास दिली व उड्डानपुलाजवळ गेले.
यावेळी त्यांना पाहताच दरोडेखोरांनी त्याची चारचाकी (एमएच ०४ डीवाय ६७९३) घेऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते पळून जात असताना सपोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाडीसह ६ दरोडेखोरांना अटक केली.
दरम्यान त्यांना अटक केली त्यावेळी विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच खरे नावं सागितली व हे दरोड्याच्या तयारीत होते हे देखील निष्पन्न झाले. यावेळी अटक करण्यात आलेले शरद श्रीरंग जाधव (रा. वाघलखेडा, ता. अंबड जि.जालना), नाथा लाला गायकवाड (रा. शास्त्रीनगर, पेठ बीड), दिपक मारोती जाधव (रा. गजानन नगर पेठ बीड), बप्पाराव जाधव (शास्त्रीनगर पेठ बीड), किरण अशोक नकवाल (रा. माऊलीनगर पेठ बीड ) , पठाण शाहरूख पठाण हमीद (रा. शहेंशाहनगर बीड वाहन चालक) असे अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी गाडी, दरोडा टाकण्यासाठी एक लोखंडी थोटी कट्यार, एक लोखंडी सळई, रोख रक्कम व मोबाईल असे एकूण ५ लाख ५६ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जप्त केलेला मुद्देमाल देखील पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाप्रतिबंधक पथक प्रमुख सपोनि गजानन जाधव, सफौ आवारे, सौदंरमल पोह. नागरगोजे, पोना. वाघ, शिंदे, जोगदंड यांनी केली. याप्रकरणाचा पुढील तपास बीड ग्रामीण ठाण्याचे सपोनि योगेश उबाळे हे करत आहेत.