माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 06:57 PM2018-02-26T18:57:49+5:302018-02-26T18:59:38+5:30

तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे.

Three mills in Majalgaon made about fourteen lakh metric tonnes of sugarcane crush | माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

माजलगावात तीन कारखान्यांनी केले साडे चौदा लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप

googlenewsNext

माजलगाव (बीड ) : तालुका परिसरात असलेल्या सुंदरराव सोळंके, जय महेश व छत्रपती या तीन साखर कारखान्यांनी शुक्रवार (ता. २४)पर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सरासरी साखर उताऱ्यात जय महेश कारखाना आघाडीवर असून परिसरात अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांचा ऊस फडातच उभा आहे. 

सतत चार वर्ष दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षापासून पावसाने मोठा दिलासा दिला आहे. समाधानकारक झालेल्या पावसाने पैठण, माजलगाव धरण शंभर टक्के भरले. दोन्ही धरणाचे कालवे, माजलगाव धरणाचे बँकवाटर, गोदावरी, सिंदफणा नदीवरील उच्चपातळी बंधारे, उर्ध्वकुंडलीका प्रकल्प यातील मुबलक पाण्याच्या उपलब्धतेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा ऊस उत्पादनासाठी पुढे सरसावला असून मोठ्याप्रमाणात ऊस लागवड झाली आहे.

माजलगाव परिसरातील ऊस गाळप करण्यासाठी तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके, सावरगाव येथील छत्रपती तर, पवारवाडी येथील जय महेश हे तीन साखर कारखाने यावर्षी पूर्णक्षमतेने सुरु आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत वरील तिन्ही कारखान्याने एकूण १४ लाख ५५ हजार ५४६ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले असून १४ लाख ७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. वरील तिन्ही कारखान्यापैकी जय महेशचा साखर उतारा सर्वाधिक (१०.०३) असून शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल वेळेवर देण्यात छत्रपती कारखाना आघाडीवर आहे. 

तीन कारखान्याचे गाळप :

कारखान्याचे नाव        -   ऊस गाळप   - साखर उत्पादन  -  सरासरी उतारा

सुंदरराव सोळंके कारखाना - ५,४९,५०० मे.ट. - ५,१४,६५० क्विंटल - ९.४६ टक्के
जय महेश कारखाना -     ६,८५,६३५ मे.ट. - ६,७७,८०० क्विंटल – १०.०३ टक्के 
छत्रपती कारखाना     -   २,२०,४११ मे.ट. – २,१५,००० क्विंटल – ९.९० टक्के

गेटकेनमुळे कार्यक्षेत्रातील ऊस फडातच 
वरील तिन्ही कारखानदारांनी गाळप हंगामाच्या सुरुवातीला गेटकेनचा (बाहेरचा) ऊस आणण्यावर भर दिला. दोन महिने सर्वाधिक तोडणी यंत्रणा बाहेर असल्याने कार्यक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस आजही फडातच उभा आहे. गाळपाच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसाचे पाणी तोडल्याने वजनात घट होत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.

Web Title: Three mills in Majalgaon made about fourteen lakh metric tonnes of sugarcane crush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.