कर्नाटकचे तीन आमदार भावंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी; परळीकरांच्या स्वागताने भारावले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 07:29 PM2022-04-04T19:29:20+5:302022-04-04T19:32:20+5:30

रविवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील तीन आमदार भावंडांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले

Three MLA siblings of Karnataka at the feet of Lord Vaidyanatha; Overwhelmed by Parlikar's hospitality | कर्नाटकचे तीन आमदार भावंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी; परळीकरांच्या स्वागताने भारावले

कर्नाटकचे तीन आमदार भावंडे प्रभू वैद्यनाथाच्या चरणी; परळीकरांच्या स्वागताने भारावले

googlenewsNext

परळी ( बीड) : प्रभू वैद्यनाथाचे दर्शन व पूजा केल्याने समाधान लाभते, यासोबतच परळीकरांच्या आत्मीय पाहुणचाराने आपण भारावून गेलो आहोत, हे प्रेम आम्हा भावंडाना कायम मिळत राहो, अशा भावना कर्नाटक येथील माजी मंत्री व आमदार राजशेखर पाटील यांनी व्यक्त केल्या. रविवारी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकातील तीन आमदारांचे महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

हुमनाबाद (कर्नाटक) येथील आमदार राजशेखर पाटील, पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. चंद्रशेखर पाटील, स्थानिक स्वराज्य संस्थेचें आमदार भीमराव पाटील  हे सख्खे भाऊ आहेत. रविवारी दुपारी त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेत अभिषेक केला. यावेळी त्यांचे  मंदिरात वैद्यनाथ ट्रस्टच्या वतीनेसचिव राजेश देशमुख विश्वस्त विजयकुमार मेनकुदळे यांनी स्वागत केले. त्यानंतर मेनकुदळे यांच्या निवासस्थानी योगेश मेनकुदळे, सुरेखा मेनकुदळे यांनी तीनही आमदार भावंडांचे स्वागत केले.

त्यानंतर तिन्ही आमदारांचा गांधीमार्केटमधील सर्वेश्वर मंदिर येथे वैद्यनाथ बँकेचे संचालक महेश निर्मळे, शिवशंकर आप्पा निर्मळे, योगेश निर्मळे, नागेश निर्मळे यांनी केला. यावेळी परळीच्या नगराध्यक्षा सरोजनी हालगे ,डॉ सुरेश चौधरी, शाहूराव  ढोबळे, विजय वाकेकर, चेतन सौंदळे, शिवकुमार व्यवहारे, सुधीर फुलारी, अश्विन मोगरकर, नगरसेवक प्रा पवन मुंडे, शिवकुमार केदारी, अनिल अष्टेकर, तसेच वीरशैव प्रतिष्ठान युवा मंच व राष्ट्रसंत श्री  शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर अनुष्ठान समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. सत्कारला उत्तर देताना माजी मंत्री राजशेखर पाटील म्हणाले, वडील कर्नाटकचे माजी मंत्री स्व. बस्वराज पाटील यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या  पुण्याईने राजकारणात आमच्या कुटुंबास यश मिळाले. जनसामान्यांच्या सेवेमुळे राजकारणात शक्ती मिळाली. 

Web Title: Three MLA siblings of Karnataka at the feet of Lord Vaidyanatha; Overwhelmed by Parlikar's hospitality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.