बीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 07:53 PM2018-10-19T19:53:51+5:302018-10-19T19:54:42+5:30

खंडेश्वरी यात्रेत भाविकांचे मोबाईल लंपास करणाऱ्या तीन चोटऱ्यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले.

Three mobile thieves in Beed's Khandeshwari Yatra arrested | बीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या 

बीडच्या खंडेश्वरी यात्रेत मोबाईल चोरणाऱ्या तिघांना बेड्या 

Next

बीड : खंडेश्वरी यात्रेत भाविकांचे मोबाईल लंपास करणाऱ्या तीन चोटऱ्यांना दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडले. त्यांच्याकडून १० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली.

राजु कुसळकर, बाळू गायकवाड (रा.गांधीनगर) व लखन विठकर (रा.इमामपूर, बार्शीनाका, बीड) अशी पकडेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत. नवरात्रोत्सव असल्याने खंडेश्वरी देविच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक गर्दी करतात. तसेच यात्रा व आनंदनगरी भरत असल्याने येथे मनोरंजन व खरेदी करणाऱ्यांची संख्याही हजारोंची असते. याच गर्दीचा फायदा घेऊन ही टोळी मोबाईल लंपास करीत होती. हाच धागा पकडून दरोडा प्रतिबंधक पथकाने सापळा लावून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सपोनि गजानन जाधव, मुंजाबा सौंदरमल, बांगर, संजय खताळ, राहुल शिंदे, चव्हाण, माया साबळे, चालक साबळे आदींनी केली.

Web Title: Three mobile thieves in Beed's Khandeshwari Yatra arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.