परळी पेट्रोल पंप हल्ला प्रकरणी तीन महिन्यानंतर मुख्य आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 06:20 PM2018-03-09T18:20:23+5:302018-03-09T18:20:23+5:30

संगम रोड जवळील पेट्रोल पंपावर ११ डिसेंबर रोजी पंप व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण व पंपाची तोडफोड करण्यात आली होती.

Three months after the Parli petrol bomb attack, the main accused arrested | परळी पेट्रोल पंप हल्ला प्रकरणी तीन महिन्यानंतर मुख्य आरोपींना अटक

परळी पेट्रोल पंप हल्ला प्रकरणी तीन महिन्यानंतर मुख्य आरोपींना अटक

Next

परळी ( बीड ) : संगम रोड जवळील पेट्रोल पंपावर ११ डिसेंबर रोजी पंप व्यवस्थापक दत्ता गुळवे यांना बेदम मारहाण व पंपाची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणात तीन आरोपी अटक होती तर २ मुख्य आरोपी फरार होते. गुरुवारी फरार आरोपींना संभाजी नगर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने बेलंबा परिसरात अटक केली.

मनोहर मुंडे व कुमार आदोडे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. याबाबत संभाजीनगर पोलिसांनी सांगितले कि, ११ डिसेंबर रोजी काही जणांनी तोंडाला रूमाल बांधून येथील पेट्रोल पंपावर धुमाकुळ घातला होता. यात मारहाण व पंपाची नासुधस या प्रकरणी पेट्रोल पंप व्यवस्थापक दत्ता गुळवे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी घटना घडल्यानंतर 2 आठवड्यात 2 आरोपींना अटक केले होते.मात्र यातील मनोहर मुंडे व कुमार आदोडे हे दोन मुख्य आरोपी फरार होते. गुरुवारी या दोघांना तब्बल 3 महिन्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांनाही न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. 

Web Title: Three months after the Parli petrol bomb attack, the main accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.