१५ हजारांची लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:20 AM2019-05-25T00:20:26+5:302019-05-25T00:20:53+5:30
चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड : चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
मारोती गंगाधर मुपडे, गोविंद रमेश लोळगे व भारत साजन मेहर अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाºयांची नावे आहेत. हे सर्व राज्य कर निरीक्षक पदावर असून वर्ग २ चे अधिकारी आहेत. १० एप्रिल रोजी या तीन अधिकाºयांनी तक्रारदाराच्या चारा छावणीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सकारात्मक पाठविण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच मागितली होती. पैकी १५ हजार रूपये घेऊन बीड तालुक्यातील जरूड फाटा येथे बोलावले. यावेळी त्यांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले होते. मात्र, नंतर त्यांना याबाबत संशय आला. त्यामुळे त्यांनी नंतर लाच स्वीकारण्यास नकार दिला. मात्र एसीबीकडे सर्व पुरावे जमा झाल्याने त्यांनी शुक्रवारी पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून या तिनही अधिकाºयांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.