बीडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तीन तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 03:25 PM2019-03-23T15:25:03+5:302019-03-23T15:26:36+5:30
बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे कारवाई
बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीडपोलिसांनी आर्म अॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
वडवणी शहरात अट्टल गुन्हेगार रणजीतसिंह नानकसिंग टाक (२७ गोपाळनगर, वडवणी) याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तलवार जप्त केली. त्याच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, विष्णू चव्हाण, सुग्रीव रूपनर, मुद्दसर सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.
दुसरी कारवाई बीड शहरातील पेठबीड भागात सपोनि अमोल धस यांच्या टिमने केली. सुरेश आवारे याच्या घरातून तलवार जप्त केली. त्याला पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई सपोनि अमोल धससह नसीर शेख, सखाराम पवार, गोविंंद काळे, रामदास तांदळे, राजु वंजारे यांनी केली.
खुलेआम तलवार घेऊन फिरतो
केज तालुक्यातील बनसारोळा येथे सुरेश गायकवाड (४४) हा खुलेआम तलवार घेऊन फिरत होता. अशी माहिती एलसीबीच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी अचानक छापा मारून सुरेशला तलवारीसह बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोह बालाजी दराडे, कल्याण तांदळे, नरेंद्र बांगर, सतीश कातखडे, सुस्कर यांनी केली. एकाच दिवशी तीन मोठ्या कारवाया झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोऱ्हाडे, एलसीबी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी या टिमचे स्वागत केले.