बीड, वडवणी, बनसारोळ्यात तीन तलवारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:12 AM2019-03-24T00:12:42+5:302019-03-24T00:13:22+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या.

Three swords seized in Beed, Wadwani, Bansar | बीड, वडवणी, बनसारोळ्यात तीन तलवारी जप्त

बीड, वडवणी, बनसारोळ्यात तीन तलवारी जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देगुन्हे दाखल : स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया, परळीत संभाजीनगर पोलिसांची कारवाई

बीड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बीड पोलिसांनी आर्म अ‍ॅक्टरच्या कारवायांवर भर दिला आहे. बीड शहरासह वडवणी व केजमधील बनसारोळा येथे तीन तलवारी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी गुन्हेही दाखल केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या कारवाया केल्या आहेत.
वडवणी शहरात अट्टल गुन्हेगार रणजीतसिंह नानकसिंग टाक (२७ गोपाळनगर, वडवणी) याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी तलवार जप्त केली. त्याच्याविरोधात वडवणी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दिलीप तेजनकर, विकास वाघमारे, विष्णू चव्हाण, सुग्रीव रूपनर, मुद्दसर सिद्दीकी यांनी ही कारवाई केली.
दुसरी कारवाई बीड शहरातील पेठबीड भागात सपोनि अमोल धस यांच्या टिमने केली. सचिन हनुमान आवारे (वय २४, रा. बलभीमनगर) याच्या घरातून तलवार जप्त केली. त्याला पेठबीड पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही कारवाई सपोनि अमोल धससह नसीर शेख, सखाराम पवार, गोविंंद काळे, रामदास तांदळे, राजू वंजारे यांनी केली.
तीन जिवंत काडतुसासह गावठी कट्टा जप्त
परळी : शहरातील कृष्ण नगर भागात संभाजीनगर पोलिसांनी सोमेश्र्वर साहेबराव गित्ते (२० रा.कृष्णनगर, परळी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून तीन जिवंत काडतुसांसह एक गावठी कट्टा जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. त्याच्याविरोधात संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जमादार विलास देशमुख, पोना सचिन सानप, बाबासाहेब आचार्य आदींनी केली.
तो तलवार घेऊन खुलेआम फिरायचा
केज तालुक्यातील बनसारोळा येथे सुरेश गायकवाड (४४) हा खुलेआम तलवार घेऊन फिरत होता. हीच माहिती एलसीबीच्या विशेष पथकाला मिळाली. त्यांनी अचानक छापा मारून सुरेशला तलवारीसह बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोह बालाजी दराडे, कल्याण तांदळे, नरेंद्र बांगर, सतीश कातखडे, सुस्कर यांनी केली. एकाच दिवशी तीन मोठ्या कारवाया झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अजित बोºहाडे, एलसीबी पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी या टिमचे स्वागत केले.

Web Title: Three swords seized in Beed, Wadwani, Bansar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.