बांधाच्या भांडणातून तिघांवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:13+5:302021-06-09T04:42:13+5:30
दाखल अंबाजोगाई : सामयिक बांधावरील दगड काढून टाकल्याच्या कारणावरून तिघांवर कुऱ्हाड आणि दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ...
दाखल
अंबाजोगाई : सामयिक बांधावरील दगड काढून टाकल्याच्या कारणावरून तिघांवर कुऱ्हाड आणि दगडाने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवाजी सुग्रीव केंद्रे (वय ३१, रा. उमराई, ता. अंबाजोगाई) असे त्या जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
शनिवारी दुपारी एक वाजता ते डोंगर पिंपळा शिवारातील स्वतःच्या शेतात असताना बालासाहेब नरसुबा केंद्रे, शहाजी बालासाहेब केंद्रे, सखूबाई बालासाहेब केंद्रे (सर्व रा. उमराई) हे तिघे त्या ठिकाणी आले. तुम्ही सामायिक बांधावरील दगड का काढून टाकला, असा जाब शिवाजी यांनी विचारताच त्या तिघांनी शिवीगाळ करत कुऱ्हाड आणि दगडाने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी सुग्रीव केंद्रे यांच्यावरदेखील कुऱ्हाडीने वार करण्यात आला तर सुनीता केंद्रे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले शिवाजी केंद्रे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पीएसआय केंद्रे करत आहेत.