नऊ हजारांचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोठडीची हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:31+5:302021-09-18T04:36:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी नगर भागात अशोक नगर येथील एका शिंप्याला अज्ञात ...

The three who stole 9,000 mobile phones need a cell | नऊ हजारांचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोठडीची हवा

नऊ हजारांचा मोबाईल चोरणाऱ्या तिघांना कोठडीची हवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी : शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी नगर भागात अशोक नगर येथील एका शिंप्याला अज्ञात चौघांनी मारहाण करून मोबाईल चोरल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा संभाजी नगर पोलिसांनी छडा लावला असून, तिघांना बुधवार, १५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. तिघाही आरोपींना २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश परळी न्यायालयाने दिले आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील शिवाजी नगर भागात मारोती मंदिरात दर्शनाला आलेल्या नेमिनाथ दगडू कांबळे यांना अज्ञातांनी वेळूच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले व नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. जखमी कांबळे यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी येथील संभाजी नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी शोधले असून, तिघांना अटकही केली आहे. याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये सिद्धार्थ ऊर्फ पिंटू देवडे (वय ३७, रा. अशोक नगर, परळी), रोहित ऊर्फ सोनू घोडके (वय २०, रा. अंबाजोगाई), अल्ताफ सादेक शेख (वय १९, रा. अंबाजोगाई) यांचा समावेश आहे.

संभाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सी. एच. मेंडके, जमादार व्यंकट भताने, विष्णू सानप, मोहन दुर्गे यांनी ही कारवाई केली. नऊ हजारांच्या मोबाईलसाठी तीनही आरोपींना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. दरम्यान, आरोपी हे घटनास्थळी ऑटो रिक्षामधून आले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Web Title: The three who stole 9,000 mobile phones need a cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.