बीड जिल्ह्यातील तीन महिला तहसिलदार होणार उपजिल्हाधिकारी
By शिरीष शिंदे | Published: August 26, 2022 12:43 PM2022-08-26T12:43:04+5:302022-08-26T12:43:36+5:30
जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाने माहिती मागवली आहे.
बीड: तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाने माहिती मागवली आहे. विभागीय चौकशी नसेल तरच पदोन्नतीचा मार्ग मोकळा आहे. या अटीनुसार बीड जिल्ह्यातील तीन महिला तहसिलदार उपजिल्हाधिकारी पदासाठी पात्र आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसिलदार (सामान्य) मंजुषा लटपटे, बीड येथील तहसिलदार (पुरवठा) अनिता भालेराव, पाटोदा तहसिलदार रुपाली चौगुले यांना उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती मिळणार आहे. दरम्यान, राज्य शासनाने सर्व विभागीय कार्यालयांना तहसिलदारांच्या याद्या पाठवून माहिती मागवली आहे.
जे तहसिलदार पुर्वी जिल्ह्यात होते त्यांच्या विरुद्ध काही विभागीय चौकशी सुरु आहे का? कोणत्या प्रकारची चौकशी आहे ?, कोणत्या कालावधीतील आहे ? याची इतंभूत माहिती मागवली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून माहिती दिली जात आहे. ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर त्यांच्या पादोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.