तीन वर्षांत २२ तरुण सरकारी बाबू एसीबीच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:03 AM2021-02-21T05:03:32+5:302021-02-21T05:03:32+5:30
बीड : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागत आहेत. माजलगाव व पाटोद्यातील कारवाईवरून हे ...
बीड : सरकारी नोकरीसाठी कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागत आहेत. माजलगाव व पाटोद्यातील कारवाईवरून हे सिद्ध झाले आहे. असाच पैशांचा मोह न आवरणारे २२ सरकारी बाबू तीन वर्षांत बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. तसेच उतरत्या वयातही २६ लोकांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.
मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात पैसे घेऊन कामे करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. अगदी २०० रुपयांपासून ते चार लाख रुपयांपर्यंत लाच घेताना हे लोकसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत; परंतु दुर्दैव म्हणजे यात २० ते ३० वर्षे वयोगटातील २२ लोकांचा यात समावेश आहे. सध्या शासकीय नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा आहे. अशा स्थितीतही कठोर परिश्रम घेऊन हे तरुण सरकारी खुर्चीवर बसतात. आपण चांगले काम करू, सामान्यांची सेवा करण्यासह प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे ध्येय खुर्चीवर बसण्यापूर्वी ठेवतात; परंतु एकदा बसले की त्यांना पैशांचा मोह आवरत नसल्याचे झालेल्या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. तरुणांबरोबरच नोकरीतून निवृत्त होण्याच्या काही दिवस आगोदरही काही लोकसेवक लाचेची मागणी करतात. अशा ५० ते ६० वर्षे वयोगटातील २६ लोकांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात बीड एसीबीला यश आले आहे.
४१ ते ५० वयोगटातील सार्वाधिक आरोपी
२०१८ ते आजपर्यंतचा आढावा घेतला असता ४१ ते ५० वयोगटातील तब्बल ३६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यानंतर ५१ ते ६० मधील २६ आणि ३१ ते ४० मधील २४ आरोपींचा समावेश आहे.
लाच स्वीकारण्यासाठी खाजगी लोकांचा आधार
सरकारी अधिकारी थेट स्वत: जास्त लाच स्वीकारत नाहीत. लाचेची मागणी करून ते वसुलीसाठी खाजगी लोकांचा आधार घेतात. सरकारी बाबूंची वसुली करणाऱ्या अशा १८ लोकांना तीन वर्षांत बेड्या ठोकल्या आहेत.
या पथकाने केल्या कारवाया
उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे, पोलीस निरीक्षक राजकुमार पाडवी, रवींद्र परदेशी, कर्मचारी एस. के. खेत्रे, अमोल बागलाने, श्रीराम गिराम, राजेश नेहरकर, सुदर्शन निकाळजे, हनुमान गोरे, सखाराम घोलप, भरत गारदे, मनोज गदळे, प्रदीप वीर, विजय बरकडे, स्नेहलकुमार कोरडे, गणेश म्हेत्रे, संतोष मोरे या पथकाने लाच घेणाऱ्या लोकसेवकांना जाळ्यात घेरले आहे.
कोट - फोटो
तीन वर्षांत ३० वर्षांच्या आतील आरोपींची संख्या वाढली आहे, हे कारवायांवरून दिसते; परंतु आरोपी कोणताही असो, तक्रार आली की सापळा लावून कारवाई केली जाते. २०१८ ते आजपर्यंत १०९ कारवाया बीड एसीबीने केल्या आहेत. यात वर्ग १, २ च्या अधिकाऱ्यांचाही जास्त समावेश आहे. तक्रारदारांनी पुढे यावे, एवढेच आमचे आवाहन आहे.
बाळकृष्ण हानपुडे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड
-----
अशी आहे आकडेवारी
वर्ष वयोगट
२१ ते ३० ३१ ते ४० ४१ ते ५० ५१ ते ६०
२०१८ ५ ११ १५ ६
२०१९ ६६७ १५
२०२० ८७ १४ ५
२०२१ ३१००
===Photopath===
200221\202_bed_21_20022021_14.jpeg
===Caption===
हानपुडे