थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 05:13 PM2022-01-27T17:13:59+5:302022-01-27T17:16:11+5:30

आधी दुचाकीला धडक दिली, त्यानंतर चार ते पाच जणांनी केले अपहरण

Thrilling! A businessman from Gevrai was abducted, beaten and thrown from a speeding jeep | थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले

थरारक ! गेवराईतील व्यावसायिकाचे अपहरण, मारहाणकरून धावत्या जीपमधून फेकले

Next

गेवराई ( बीड ) : तालुक्यातील मादळमोही येथील एका व्यावसायिकाचे अज्ञात पाच ते सहा जणांनी साठेवाडी फाटा येथून अपहरण करून बेदम मारहाण करत वडीगोद्रीजवळ फेकून दिल्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी एक जीप पाटात ढकलून अन्य जीमधून पोबारा केला. 

कैलास शिंगटे ( रा. मादळमोही ) असे अपहरण झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शिंगटे दुचाकीवरून जात असताना एका जीपने पाठीमागून त्यांना धडक दिली. त्यानंतर जीपमधील चार ते पाच जणांनी शिंगटे यांचे अपहरण केले. त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण केली. अपहरणकर्त्यांनी त्यांचाकडे तब्बल २ कोटींची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्याने शिंगटे यांच्या शरीरावर जखमा करुन छळ केला. 

दरम्यान, वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ जीप बंद पडल्याने ती कालव्यात ढकलून दिली. येथे शिंगटे यांच्या खिशातील आधार कार्ड, पँन कार्ड व अन्य काही कागदपत्रे टाकून दुसऱ्या जीपमधून शिंगटे यांना घेऊन अपहरणकर्ते पुढे गेले. काही अंतरावर त्यांनी शिंगटे यांनी देखील धावत्या जीपमधून खाली फेकून दिले. 

कालव्यात पडलेली जीप काही जणांच्या निदर्शनास आली. तेथे नागरिकांना शिंगटे यांची कागदपत्रे आढळून आली. यावरून नागरिकांनी शिंगटे यांच्या कुटूंबांशी संपर्क साधला. दरम्यान, शिंगटे यांनी एका हॉटेलवरून वडिलांना फोन केला. आपबीती सांगून वडीगोद्रीजवळ एका हाँटेलवर असल्याचे शिंगटे यांनी वडिलांना सांगितले. याप्रकरणी चकलांबा ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी कोणीही आले नसल्याचे सपोनि भास्कर नवले यांनी सांगितले.

Web Title: Thrilling! A businessman from Gevrai was abducted, beaten and thrown from a speeding jeep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.