तावातावात आला अन् वृध्देचा गळा चिरुन गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:13 AM2019-01-21T01:13:22+5:302019-01-21T01:13:48+5:30

शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) यांच्यामुळेच माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांनीच करणी केल्यामुळे माझी बायको नांदत नाही अशा संशयावरुन तावातावात आलेल्या अशोक जंगले या शेजाऱ्याने शीलावती यांचा बतईने गळा चिरुन हत्या केली.

The throats of old age and old age have eroded | तावातावात आला अन् वृध्देचा गळा चिरुन गेला

तावातावात आला अन् वृध्देचा गळा चिरुन गेला

Next
ठळक मुद्देपेठ बीडमधील प्रकरण : करणीच्या संशयावरुन खून केल्याची आरोपीची कबुली

बीड : शीलावती गिरी (५०, रा. अयोध्यानगर, बीड) यांच्यामुळेच माझा संसार उद्ध्वस्त झाला. त्यांनीच करणी केल्यामुळे माझी बायको नांदत नाही अशा संशयावरुन तावातावात आलेल्या अशोक जंगले या शेजाऱ्याने शीलावती यांचा बतईने गळा चिरुन हत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली होती. त्यानंतर अवघ्या १० तासात पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
शनिवारचा दिवस बीड पोलीस दलाला हादरविणारा ठरला. अवघ्या २४ तासात खुनाच्या तब्बल ३ घटना घडल्या. यात अंबाजोगाईचा नगरसेवक, शिरुरमधील तरुण व पेठबीडमधील शीलावती गिरी या महिलेचा समावेश होता. शीलावती या धार्मिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या बाजूलाच अशोक जंगले यांचे घर आहे. अशोक व त्याची पत्नी अंजली यांच्यात नेहमीच वाद होत असत. त्यामुळे त्याने शीलावती यांच्याकडून खाजगी उपचार करुन घेतले. मात्र, काहीच फरक पडला नाही. उलट त्यांच्यात वाद वाढत गेले. शीलावती यांच्यामुळेच आपल्यात वाद वाढले, त्यांनी आपल्या घरावर करणी केली. त्यामुळेच संसार उद्ध्वस्त होत असल्याच्या संशयावरुन अशोक जंगले संतापला होता.
शनिवारी सकाळी शीलावती या पती भिक्षा मागण्यासाठी गेल्याने घरात स्वयंपाक करीत होत्या. याचवेळी अशोक हा स्वत:च्या घरातून भाजी कापण्याची बतई घेऊन आला. थेट शीलावती यांच्या घरात प्रवेश करीत उजव्या हाताने त्यांचा गळा चिरुन हत्या केली. शीलावती मरण पावल्याची खात्री पटताच तो आल्या पावली परत निघाला. बाजूलाच असणाºया विहिरीत बतई टाकून तो दुचाकीवरुन पसार झाला. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उप अधीक्षक सुधीर खिरडकर, पो. नि. बाळासाहेब बडे यांनी तपास सुरु केला. आरोपी निष्पन्न करुन अवघ्या १० तासात त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी किसन गिरी यांच्या फिर्यादीवरुन अशोक जंगले विरोधात पेठबीड ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The throats of old age and old age have eroded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.